कोरोनामुळे चौघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:01 AM2020-11-11T00:01:10+5:302020-11-11T00:57:05+5:30

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत असले तरी मागील तीन ते चार दिवसांपासून दररोज शंभरापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी (दि.१०) जिल्ह्यात २०० नवे रुग्ण आढळून आले. तसेच चौघांचा मृत्यू झाला. बळींमध्ये शहर व ग्रामीणमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. बळींचा एकूण आकडा आता १ हजार ७११ इतका झाला आहे.

Corona kills four | कोरोनामुळे चौघांचा बळी

कोरोनामुळे चौघांचा बळी

Next
ठळक मुद्दे२०० नव्या रुग्णांची पडली भर : बळींचा आकडा १ हजार ७११

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत असले तरी मागील तीन ते चार दिवसांपासून दररोज शंभरापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी (दि.१०) जिल्ह्यात २०० नवे रुग्ण आढळून आले. तसेच चौघांचा मृत्यू झाला. बळींमध्ये शहर व ग्रामीणमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. बळींचा एकूण आकडा आता १ हजार ७११ इतका झाला आहे.

सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये एकीकडे गर्दी उसळत असताना दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीतीदेखील व्यक्त होत आहे. थंडीची तीव्रताही हळूहळू वाढताना दिसत आहे. यामुळे कोरोनाचे संकट टळले असे समजून गाफील राहून चालणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. नागिरकांकडून कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत निष्काळजीपणा केला जात असून हे घातक ठरणारे आहे. मंगळवारी जिल्ह्याची बाधितांची संख्या ९५ हजार ९४४ इतकी झाली तर आतापर्यंत ९१ हजार ४२१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ हजार ८१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२९ टक्के इतके आहे, तर कोरोबाधितांचे प्रमाण २७.७७ टक्क्यांवर आले आहे. सध्या एकूण ६७५ अहवाल प्रलंबित आहेत. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात ६००पेक्षा अधिक संशयित रुग्ण दाखल झाले. शहरात कोरोना संशयित रुग्णांची संख्या दररोज पाचशेच्या पटीत आढळून येत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागिरकांनी अधिक खबरदारी घेत मास्कचा नियमित वापर करत सामाजिक अंतर राखण्यावर भर देणे गरजेचे आहे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Web Title: Corona kills four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.