कोरोनामुळे जीवनच उसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:43+5:302021-05-01T04:13:43+5:30
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमध्ये कोरोना महामारीचा प्रभाव ग्रामीण भागातील ...
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमध्ये कोरोना महामारीचा प्रभाव ग्रामीण भागातील टेलरिंग व्यवसायावर होत असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. देश पुन्हा कोरोना संकटात सापडला आहे. गतवर्षी ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर कोरोनाचे संकट आले आहे. मार्च महिन्यात सुरू झालेले दुष्टचक्र यंदाच्या उन्हाळ्यातही संपले नाही. मागील वर्षी कसेतरी या संकटाला तोंड दिले. घरात होते त्यावर दिवस काढले. यावर्षीही कोरोनामुळे रोजगार गेला. त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे जगणेच धोक्यात आले आहे. टेलरिंग व्यवसायात काम करणाऱ्या कारागिरांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.
कोट.,...
ऐन लग्नसराईच्या दिवसांत लॉकडाऊन असल्याने टेलरिंग व्यवसायाचा हंगाम हातून गेला आहे. त्यासोबतच मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सणातही प्रतिसाद मिळणार नाही. आम्हा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- मनोज वटारे , टेलरिंग व्यावसायिक