कोरोना रुग्णसंख्या; जिल्हा शंभरीपार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 02:36 AM2020-04-22T02:36:00+5:302020-04-22T02:37:14+5:30
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा मालेगावच्या भयावह वेगाने घडणाऱ्या पॉझिटिव्ह केसेसमुळे थेट ११० वर पोहोचला आहे. मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये मालेगावच्या ११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मालेगावची बाधितसंख्या थेट ९६ वर पोहोचली आहे. त्याआधी दिवसभरात जिल्हा रुग्णालयातील १९ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा मालेगावच्या भयावह वेगाने घडणाऱ्या पॉझिटिव्ह केसेसमुळे थेट ११० वर पोहोचला आहे. मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये मालेगावच्या ११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मालेगावची बाधितसंख्या थेट ९६ वर पोहोचली आहे. त्याआधी दिवसभरात जिल्हा रुग्णालयातील १९ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये मालेगावची रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण भयावह असून, त्या संख्येला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयास केले जात आहेत. तरीदेखील मालेगावमध्ये अक्षरश: दिवसामागून कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. मालेगावमध्ये केवळ आठ क्षेत्रात कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आले होते.
हा परिसर पूर्णपणे सील केला असतानाही आता या क्षेत्राबाहेर रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. त्यामध्ये शहरातील संगमेश्वर, मोतीबाग नाका, संजय गांधीनगर, जाधवनगर, मोमीनपुरा, दातारनगर, जुने आझादनगर, जुना इस्लामपुरा, भायखळा झोपडपट्टी या भागाचा समावेश आहे.
त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसोबतच आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. तरीदेखील कोरोना कमी होण्याचे
नाव घेत नसल्याने आरोग्य यंत्रणादेखील पुरती जेरीस आली आहे. दरम्यान, नाशिकचे एकूण १९ अहवाल
निगेटिव्ह आल्याने नाशिकच्या
आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
रुग्णसंख्या ९६ वर
मालेगाव शहरातील कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ९६ वर पोहोचली असतानाच मृतांचा आकडादेखील वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत एकूण ८ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी एका कोरोना संशयिताचा मृत्यू झाला. मात्र, त्याचा अहवाल मिळणे अद्याप बाकी आहे.