कोरोनावर वेळीच तपासणीसह उपचार करणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:07 AM2021-05-04T04:07:35+5:302021-05-04T04:07:35+5:30
कोरोना झाला तरी त्याला घाबरून जाऊ नये. आज अनेक रुग्ण मानसिकरीत्या खचलेले असल्याने उपचाराला आवश्यक प्रतिसाद देत नसल्याचे ...
कोरोना झाला तरी त्याला घाबरून जाऊ नये. आज अनेक रुग्ण मानसिकरीत्या खचलेले असल्याने उपचाराला आवश्यक प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वात अगोदर रुग्णांनी कोणतीही मनात भीती न बाळगता उपचार घ्यावे. वेळीच रुग्णालयात जावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घरी उपचार करण्याचा निर्णय घ्यावा. घरी उपचार घेणाऱ्यांनीही काळजी घ्यावी. संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, नियमित ऑक्सिजन लेव्हल तपासावी. लेव्हल कमी झाली तरी घाबरून जाऊ नये. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू ठेवावे. वेळीच निदान व उपचार केल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य आहे.
- डॉ. राजेंद्र बागुल. वैद्यकीय अधिकारी, कसबे वणी
फोटो- ०३ डॉ. राजेंद्र बागुल
===Photopath===
030521\03nsk_24_03052021_13.jpg
===Caption===
- डॉ.राजेंद्र बागुल. वैद्यकीय अधिकारी,कसबे वणी