नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षक, कोविड सेल प्रमुखांना कोरोना; शनिवारीच घेतला होता कोरोना लसीचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 09:55 PM2021-03-25T21:55:21+5:302021-03-25T22:07:08+5:30
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याचा महापालिकेलाही त्याचा विळखा बसू लागला आहे. काेरोना विषय हाताळणारे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे आणि कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे दोघांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

गेल्या वर्षी कोराेनाचे संकट आल्यानंतर नाशिक महापालिकेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणाऱ्या दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना केारोना संसर्ग झाला होता. त्यानंतर आता फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यात कोरोना संसर्ग वाढल्यानंतर महापालिकेत देखील त्याचा संसर्ग होऊ लागला आहे. आज अँटिजेंन चाचणीत डॉ. बापुसाहेब नागरगोजे आणि डॉ. आवेश पलोड हे संसर्ग बाधीत आढळल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे दोघांनाही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. डॉ. नागरगोजे यांनी अलिकडेच आपला दुसरा डोस पुर्ण केल्यानंतर त्यांना पहिल्या वेळेस प्रमाणेच आत्ताही लसीकरणानंतर त्यांना ताप आला होता. तशा स्थितीतही गेले देान दिवस ते वैद्यकीय विभागाच्या भरतीसाठी मुलाखती घेत होते आणि नंतर काेरोना संदर्भातील अन्य कामकाज देखील करीत होते परंतु प्रकृती जरा जास्त बिघडल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी तसेच सर्दी खोकल्यामुळे त्रस्त झालेल्या डॉ. पलोड यांनी आज नाशिक पुणे रोडवरील समाज कल्याण विभागात अँटिजेंन चाचणी घेतली त्यात ते पॉझीटीव्ह आढळले.
अलिकडेच महापालिकेचे आणखी एक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे पॉझीटीव्ह आले होते. मुख्यालयात महत्वाची जबाबदारी सांभाळणारे डॉ. शेटे हे नागरगोजे आणि पलोड यांच्या संपर्कात देखील होते. या दोन्ही डॉक्टरांना संसर्ग झाल्याने त्यांच्या संपर्कातील किमान तीस ते पस्तीस अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. या दोन डॉक्टरांबरोबरच एक फॉर्मासिस्ट देखील पॉझीटीव्ह आला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने सुपर स्प्रेडर्स शोधण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात आरटीपीसीआर चाचण्या केल्या त्यात चौदा कर्मचारी बाधीत आढळले आहेत.