कोरोना अद्याप गेलेला नाही, या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:36+5:302021-06-03T04:11:36+5:30
इन्फो..१ बाजारपेठेत प्रचंड गर्दी, मास्क आणि सुरक्षित अंतर किंवा तत्सम नियमांचे पालन केले गेले नाही. त्याचा फटका बसला. इन्फो..२ ...
इन्फो..१
बाजारपेठेत प्रचंड गर्दी, मास्क आणि सुरक्षित अंतर किंवा तत्सम नियमांचे पालन केले गेले नाही. त्याचा फटका बसला.
इन्फो..२
सार्वजनिक सोहळे, जयंत्या, पुण्यतिथी, सणासाठी बाजारात गर्दी करू नका असे आवाहन करूनही अनेक ठिकाणी गर्दी झाली होती.
इन्फो..३
लग्न साेहळ्यांना पंचवीस आणि पन्नास वऱ्हाडींची मर्यादा असताना दाेनशे ते तीनशे नागरिकांना जमवून सोहळे करण्यात आले. त्यात राजकीय नेतेही अग्रभागी होते.
इन्फो..४
वाढदिवस आणि तत्सम सोहळे धडाक्यात होऊ लागले. त्यामुळे वाढलेल्या गर्दीनेही कोरोना स्प्रेड होत गेला.
इन्फो..५
हॉटेल्स आणि मॉल्समध्ये प्रचंड गर्दी झाली. त्यात कुठेही आरोग्य नियमांचे पालन होेत नव्हते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले.
इन्फो...
महापालिका, पोलिसांच्या पथकांची असेल नजर
- महापालिकेने सहाही विभागांत विभागीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली सहा पथके तयार केली असून, ती प्रामुख्याने आरोग्य विषयावर नजर ठेवून आहेत.
- पोलिसांची एकूण ३३ पथके देखील आरोग्य तसेच आरोग्य नियमांचे पालन होते किंवा नाही, यावर नजर ठेवून आहे.
- महापालिकेच्या वतीने भाजीबाजारात कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास दहा दिवस बाजार बंद करण्यात येणार आहे.
- महापालिकेच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रामुख्याने कारवाई केली जात आहे.
- रस्त्यावर अनावश्यक येणाऱ्यांना अडवून त्यांचे काम काय, कशासाठी बाहेर आलेत, यासाठी ३३ पॉइंट पोलिसांनी तयार केले आहेत.
- रिक्षा, कूल कॅब यांसारख्या वाहनातून नियमबाह्य संख्येने प्रवासी वाहतूक होते का हे तपासले जाते आहे. तसेच निर्बंध असतानाही दुकान उघडणाऱ्यांवर देखील कारवाई केली जात आहे.
इन्फो ग्राफ...
पहिला अनलॉक ४ ऑगस्ट २०२०
एकूण कोरोना रुग्ण- १६,६०३
मृत्यू- ५३३
दुसरा अनलॉक १ जून २०२१
एकूण कोरोना रुग्ण- ३,८६,२८०
मृत्यू- ४,७५४
===Photopath===
020621\02nsk_21_02062021_13.jpg
===Caption===
कोरोना गर्दी डमी