कोरोनाबाधित ५६७५; बळी ३९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:44+5:302021-04-26T04:13:44+5:30
नाशिक : काेरोना बळींनी रविवारी (दि. २५) एकूण ३९ पर्यंत मजल गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या ३३११ वर पोहोचली ...
नाशिक : काेरोना बळींनी रविवारी (दि. २५) एकूण ३९ पर्यंत मजल गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या ३३११ वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्या पुन्हा साडेपाच हजारांचा आकडा ओलांडून एकूण ५६७५ पर्यंत पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २७२७, तर नाशिक ग्रामीणला २७०९ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १२१ व जिल्हाबाह्य ११८ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला २६ असा एकूण ३९ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक राहिली आहे. तरीदेखील नागरिक निर्बंधांबाबत तितकेसे दक्ष दिसून येत नसल्याने अजून कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे चित्र जाणवत आहे.
इन्फो
उपचारार्थी थेट ४८ हजारांवर
जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ४८ हजारांवर जाऊन एकूण ४८५७१ वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यात २७ हजार ७९७ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १८ हजार ६५५ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, १ हजार ८३६ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य २८३ रुग्णांचा समावेश आहे.
इन्फो
प्रलंबित अहवालात थोडी घट
गत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या मोठी राहत होती. मात्र, रविवारी प्रलंबित अहवालांची संख्या पूर्वीच्या तुलनेत काहीशी कमी म्हणजे ५३९८ वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे ३४२१ असून नाशिक मनपा क्षेत्रातील १८७९, तर मालेगाव मनपाचे ९८ अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या मागील आठवड्याच्या पेक्षा काहीशी कमी होण्याची चिन्हे आहेत.