नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक ; बळींची संख्या १५ अहवाल येण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू : मृतांत नाशकातील महिलेसह मालेगावचे दोघे; जिल्ह्यात ४७० बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 01:55 AM2020-05-06T01:55:39+5:302020-05-06T01:57:17+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तब्बल १५वर पोहोचला आहे. अहवाल येण्यापूर्वीच दगावलेले तिघे मृत बाधित असल्याचे मंगळवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तब्बल १५वर पोहोचला आहे. अहवाल येण्यापूर्वीच दगावलेले तिघे मृत बाधित असल्याचे मंगळवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. दरम्यान, रात्री उशिरा मालेगावचे आणखी ३७ जण पॉझिटिव्ह आढळल्याने एकट्या मालेगावची बाधितांची संख्या ३८४ वर पोहोचली. तर जिल्ह्याचा बाधितांचा आकडा ४७० पर्यंत गेला.
मंगळवारी मालेगावसह नाशिक जिल्ह्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यात मालेगाव येथील ५५, येवला येथील १७, देवळाली कॅम्प येथील ७ तर नाशिक शहरातील ४ जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या तब्बल ४७० वर पोहोचल्याने यंत्रणेची चिंता वाढली आहे.
नाशकात २ मे रोजी शासकीय रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा मृत्यूपूर्वी घेतलेल्या नमुन्याचा तपासणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने शहरातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. गेल्या आठवड्यात या महिलेची प्रसूती धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला आडगाव रुग्णालयात तातडीने दाखल होण्यास २४ एप्रिल रोजी सांगण्यात आले होते; २ मे रोजी ही महिला शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यापूर्वी तिची चाचणी करण्यात आली होती. मालेगावी दोनजणांचा काही दिवसापूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांचाही पॉझिटिव्ह अहवाल मंगळवारी प्राप्त झाला.