साकोरा येथे कोरोनाबाधित रूग्णाचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 08:37 PM2020-08-26T20:37:18+5:302020-08-27T02:42:39+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, बुधवारी (दि.२६) दुपारी एका ६२ वर्षीय पॉझीटिव्ह रूग्णाचा ग्रामिण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, बुधवारी (दि.२६) दुपारी एका ६२ वर्षीय पॉझीटिव्ह रूग्णाचा ग्रामिण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी साकोरा येथील एकाच घरातील सहा जणांना तर दुसऱ्या कुटुंबातील एक असे सात पॉझीटिव्ह रूग्ण आढळून आल्याने त्यांच्यावर सारताळे येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवस गावही बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुसºयाच आठवड्यात पुन्हा तीन पॉझीटिव्ह रूग्ण आढळल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. तीन दिवसांपूर्वीच एकाच घरातील सहा जणांपैकी पाच जण टिगेटिव्ह आल्याने त्यांची घरवापसी करण्यात आली.
गावातील एका ६३वर्षीय व्यक्तीला मंगळवारी (दि.२५) दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालय (कोविड सेंटर) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्रभर त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी (दि.२६) दुपारी त्यांचे निधन झाले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गुरुवारी (दि.२७) दिवसभरात संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे तसेच संपर्कात आलेल्यांना ताब्यात घेवून त्यांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहीती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. ससाणे तसेच वैद्यकिय अधिक्षक डॉ. रोहन बोरसे यांनी दिली. दरम्यान सर्व नरिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.