कोरोना रुग्णांना मिळते सकस जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 07:12 PM2021-05-29T19:12:24+5:302021-05-30T00:01:47+5:30
लासलगांव : ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या भूमिकेतून येथील कांदा व्यापारी चोथानी परीवार गावातील कोरोना रुग्णांकरीता आपल्या मित्र मंडळींच्या मदतीने रोज जेवण पुरविण्याची सेवा करीत आहेत.
लासलगांव : ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या भूमिकेतून येथील कांदा व्यापारी चोथानी परीवार गावातील कोरोना रुग्णांकरीता आपल्या मित्र मंडळींच्या मदतीने रोज जेवण पुरविण्याची सेवा करीत आहेत.
कांदा व्यापारात फारशी उसंत मिळत नाही, तरी सामाजिक बांधिलकी म्हणुन लासलगाव येथील चोथानी परिवार आणि मित्र मंडळाकडून कोरोना रुग्णांची दोन वेळच्या जेवणाची विनामूल्य व्यवस्था सेवा दीड महिन्यापासून सुरू केल्याने या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण कुटुंब व्यवस्था हादरून गेली असताना हॉस्पिटलला दाखल झालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सकस जेवण येथील चोथानी परिवार आणि मित्र मंडळी सुमारे ७० ते ८० रुग्णांना रोज दोन वेळचे जेवणाचे डबे पुरवले जात आहे.
वरण, भात, पोळी, भाजी, खिचडी, सलाड, ताक, चटणी, कांदा, लिंबू व्यवस्थीत पॅक करून रुग्णांना दोन वेळ पुरविले जात असून आजपर्यंत परिसरातील दोन ते अडीच हजार रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
विंचूररोडवरील चोथानी यांच्या कांद्याच्या खळ्यात स्वयंपाक बनवण्याची व्यवस्था केली आहे, याठिकाणी स्वयंस्फूर्तीने मदत कार्य केले जात असून गेल्या दीड महिन्यापासून चोथानी कुटुंब व त्यांच्या मित्रपरिवारासह राबतांना दिसत आहे.
चौकट.....
विशेष म्हणजे या परिवाराने कोरोनाच्या पहिल्या लाटेत परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पोचवण्याचे तसेच त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली होती. कोणताही आर्थिक मोबदला न घेता स्वखर्चाने वेगवेगळ्या राज्यात या कामगारांना पोहोचवण्यात आले होते.
विशेष म्हणजे हे कार्य चालू असताना परिसरात कोणत्याही मुक्या जनावरांना अपघात की व्याधी झालेली असल्यास या ग्रुपकडून सेवा केली जात आहे.
या उपक्रमासाठी पुरुषोत्तम चोथानी, प्रतीक्षा चोथानी, ओम चोथानी, प्रतिक्षा चोथानी, गायत्री चोथानी, प्रतिक चोथानी, भगवती राणा, शामलता ऊपाध्ये, विशाल पालवे, सुरज नाईक, अजिंक्य खांगळ, अभिजित जाधव, सुरज आब्बड, त्र्यंबक ऊपाध्ये, सागर चोथानी, प्रियंका चोथानी, समीर गुंजाळ, अमित वर्मा, प्रमोद खाटेकर, सपना चोथानी, कृष्णा चोथानी यांच्या सह अनेकव्यक्ती या उपक्रमात सहभागी आहेत.
या उपक्रमात जेवणाच्या सुविधेबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल उपलब्ध करून देणे, ऑक्सीजन सिलेंडर, औषधे तसेच येणाऱ्या इतर अडचणी यासाठी आम्ही मदत कार्य करत आहोत.
- विशाल पालवे, लासलगांव.