कोरोना पावला; बारावीचा निकालाचा ऐतिहासिक उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 01:42 AM2021-08-04T01:42:50+5:302021-08-04T01:43:45+5:30
कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील बारावीची अंतिम परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मंगळवारी निकाल जाहीर केला असून, यावर्षी बारावीच्या निकालाने गतवर्षाच्या तुलनेत सुमारे ११ टक्क्यांनी वाढ नोंदवत ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील बारावीची अंतिम परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मंगळवारी निकाल जाहीर केला असून, यावर्षी बारावीच्या निकालाने गतवर्षाच्या तुलनेत सुमारे ११ टक्क्यांनी वाढ नोंदवत ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. नाशिक जिल्ह्यातून बारावीचे ६८ हजार ५१६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६८ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ९९.५७ टक्के लागला आहे. यात ३६ हजार ९४७ मुलांचा व ३१ हजार २७६ मुलींचा समावेश आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन आठवड्यांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली होती. अखेर मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाला. दहावीप्रमाणेच बारावीचा निकाल मूल्यमापन पद्धतीने तयार करण्यात आल्याने निकालाची टक्केवारी वाढली आहे. मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने बारावीची परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला व विद्यार्थ्यांने दहावीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे गुण, अकरावी परीक्षेत तीन विषयात मिळवलेल्या गुणांची सरासरी व बारावीतील प्रथम सत्र, सराव परीक्षा आणि चाचण्यांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला.
----
शाखानिहाय निकाल असा
विज्ञान- प्रविष्ट - पास - प्रमाण (टक्केवारीत)
मुले - १५,४८६- १५,३९३ - ९९.३९
मुली - १२,४५६- १२,३७४ - ९९.३४
एकूण - २७,९४२- २७,७६७ - ९९.३७
----
कला -प्रविष्ट - पास - प्रमाण (टक्केवारीत)
मुले - १२,९१३ -१२,८७७ - ९९.७२
मुली - ११,००७ - १०,९९२ -९९.८६
एकूण- २३,९२० - २३,८६९ -९९.७८
----
वाणिज्य - प्रविष्ट - पास - प्रमाण (टक्केवारीत)
मुले - ६७९६ - ६७८७ - ९९.८६
मुली - ७३१९ - ७३१२ - ९९.९०
एकूण -१४,११५ -१४,०९९ -९९.८८