कोरोना पावला ; आठवीपर्यंतचे साडेनऊ लाख निद्यार्थी हजार विना परीक्षा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:29+5:302021-04-04T04:15:29+5:30

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ...

Corona Pavla; Nine and a half lakh students up to VIII pass without examination | कोरोना पावला ; आठवीपर्यंतचे साडेनऊ लाख निद्यार्थी हजार विना परीक्षा पास

कोरोना पावला ; आठवीपर्यंतचे साडेनऊ लाख निद्यार्थी हजार विना परीक्षा पास

Next

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोनाच पावल्याची प्रतिक्रिया दिली असून शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे ९ लाख ६० लाख ५७४ विद्यार्थी विना परीक्षा पास होणार आहे.

राज्यातील शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून सर्व विद्यार्थ्यांंना पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी खूश झाले असले तरी पालकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. कोरोनामुळे मागच्या वर्षीही विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या, आता सलग दुसऱ्या वर्षी हीच परिस्थिती ओढवल्याने पालक चिंतेत असून कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण होऊ शकते तर ऑनलाईन परीक्षा का नाही, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

पालक म्हणतात.. ऑनलाईन परीक्षेचा पर्याय

कोट- १

विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्यासाठी तसेच ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांनी काय ज्ञानार्जन केले आहे, हे तपासण्यासाठी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय आहे. शिक्षण विभागाने याविषयी कोणताही विचार न करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पुनर्विचार करून ऑनलाईन परीक्षेचा विचार करणे आवश्यक आहे.

- अंजली शिंदे, पालक

कोट-२

कोरोनाच्या संकट काळातही शाळांनी ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांकडून संपूर्ण शुल्क आकारले आहे. आता परीक्षांच्या माध्यमातून त्यातून विद्यार्थी काय शिकले हे समोर आले असते. मात्र शिक्षण विभागाने परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे परीक्षा थेट रद्द न करता ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळांना सांगितले पाहिजे.

सुदाम देवरे, पालक

कोट-३

ग्रामीण भागात अजूनही काही गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला नाही. अशा काही ठिकाणी शाळाही सुरू आहेत. संबधित शाळांमध्ये योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून परीक्षा घेणे आवश्यक आहे. परंतु, सलग दुसऱ्या वर्षाचही परीक्षा होणार नसतील तर विद्यार्थ्यांना परीक्षांचे गांभीर्यच उरणार नाही.

रमेश गायकर, पालक

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात.

कोट-१

कोरोनाच्या संकटातही शिक्षकांनी वर्षभर अध्यापनाचे काम केले असून सर्वांचीच परीक्षेला सामोरे जाण्याची तयारीही होती. परंतु, सध्याची परिस्थिती विचारात घेता शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. आरटीई कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्यय अतिशय चांगला असून त्याचे स्वागत आहे.

- राजेंद्र निकम, कार्यवाह, नाशिक एज्युकेशन सोसायटी

कोट-२

विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्यासाठी शासनाने स्वयंस्पष्ट असा शासन निर्णय जारी करून या प्रक्रियेविषयी शाळांना शिक्षकांना मार्गदर्शन करावे, त्याचप्रमाणे शासनाने किशोरवयीन मुलांसाठी लस तयार करण्याच्या दृष्टीने विचार करणे आ‌वश्यक असून गेल्या वर्षाप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. मात्र कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने सध्यस्थितीत घेतलेला निर्णय योग्य असून सर्वांनी त्या परिस्थितीत शासनासोबत उभे राहणे आवश्यक आहे.

- नंदलाल धांडे, अध्यक्ष, खासगी प्राथमिक महासंघ नाशिक .

पॉईंटर

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

पहिली -१,१७०४५

दुसरी - १,२१,३४२

तिसरी -१,२०,६१८

चौथी - १,२३,९३९

पाचवी - १,२२,७४३

सहावी - १,२०,६४५

सातवी - १,१८,३३२

आठवी - १,१५,९१०

जिल्ह्यातील शाळा - ५६२६

जिल्ह्यातील शिक्षक -१२, ३२४

Web Title: Corona Pavla; Nine and a half lakh students up to VIII pass without examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.