कोरोनाने बॅण्ड वाजवला, आता आम्हाला वाजवू द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 10:28 PM2021-06-23T22:28:56+5:302021-06-23T23:48:10+5:30
पिंपळगाव बसवंत : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने बॅण्ड व्यावसायिक व त्याच्यावर पोट भरणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असून, कोरोनाने व्यावसायिकांचा बॅण्ड वाजवला आहे. आता कोरोनाचा धोका कमी झाल्याने बॅण्ड व्यावसायिकांना परवानगी देण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाशिक जिल्हा बॅण्ड/बँजो असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे.

कोरोनाने लग्नसमारंभावर मर्यादा आल्या. त्यातूनच त्यावर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यवसायही कोलमडले. बॅण्ड व्यावसायिकांच्या रोजगारावर गंडांतर आले. व्यवसाय कसा करावा, कामगारांना कसे पोसायचे या आर्थिक विवंचनेत बॅण्डवाले अडकले. आता कोरोनाचा धोका कमी होत असताना बरेच निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्यात लग्नसमारंभ व शुभकार्यात बॅण्ड वाजवू देण्यास परवानगी द्यावी यासाठीचे निवेदन नाशिक जिल्हा बॅण्ड असोसिएशनच्या वतीने जिल्हा अध्यक्ष शेख मास्टर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, निफाड तालुका अध्यक्ष सुखदेव मोटमल, दिंडोरी तालुका अध्यक्ष योगेश शिंदे, नाशिक तालुका अध्यक्ष संतोष मेंधळे, उपाध्यक्ष राजू बिवाल उपस्थित होते. याबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सांगण्यात आले. (२३ पिंपळगाव २)