कोरोना’ कक्षाबाहेर पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 11:45 PM2020-04-06T23:45:00+5:302020-04-06T23:45:38+5:30

न्‘शिक : शनिवारी जिल्हा रुग्णालयातून निगेटिव्ह रिपोर्ट आलेला संशयित पसार झाला होता. यानंतर कोरोना कक्षाबाहेर दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोरोना कक्षातून रुग्णांनी पळ काढू नये यासाठी विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच येथील कर्मचारीवर्गाला आवश्यक ती सुरक्षा साधने पुरविण्यात आली आहेत.

Corona 'police settlement outside the classroom | कोरोना’ कक्षाबाहेर पोलीस बंदोबस्त

कोरोना’ कक्षाबाहेर पोलीस बंदोबस्त

Next
ठळक मुद्दे कर्मचारीवर्गाला आवश्यक ती सुरक्षा साधने पुरविण्यात आली आहेत.

न्‘शिक : शनिवारी जिल्हा रुग्णालयातून निगेटिव्ह रिपोर्ट आलेला संशयित पसार झाला होता. यानंतर कोरोना कक्षाबाहेर दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोरोना कक्षातून रुग्णांनी पळ काढू नये यासाठी विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच येथील कर्मचारीवर्गाला आवश्यक ती सुरक्षा साधने पुरविण्यात आली आहेत.
कोरोना कक्षात उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ३०० ‘पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट’ (पीपीई) गणवेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात मास्क, टोपी, ग्लोव्हज, गाऊन, शुकव्हर, गॉगल असा सेट पुरवण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. कोरोना संशयित व बाधित रुग्णांच्या सतत संपर्कात राहणारे व त्यांच्यावर उपचार करणाºया डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ३०० पीपीई गणवेश पुरवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तसेच ५ हजार एन-९५ मास्क, ५० हजार थ्री लेअर मास्क, एक हजार एक्स-रे फिल्मस जिल्हा रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
देवळाली कॅम्प येथील बार्न्स स्कूल येथेदेखील विलगीकरण रुग्णालय उभारण्यास संस्थेने संमती दिली आहे. त्यामुळे याठिकाणी २०० खाटांचे विलगीकरण रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले आहे.

Web Title: Corona 'police settlement outside the classroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.