कोरोना प्रतिबंधक दीड लाख डोस उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:16 AM2021-03-16T04:16:06+5:302021-03-16T04:16:06+5:30

नाशिक- काेरोनाच्या वाढत्या संसर्गालाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक लसीकरणाला चांगला वेग आला आहे. महापालिकेला प्राप्त ७५ हजार ७०० इतके कोव्हिशिल्डचे डोस ...

Corona preventive 1.5 million doses will be available | कोरोना प्रतिबंधक दीड लाख डोस उपलब्ध होणार

कोरोना प्रतिबंधक दीड लाख डोस उपलब्ध होणार

Next

नाशिक- काेरोनाच्या वाढत्या संसर्गालाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक लसीकरणाला चांगला वेग आला आहे.

महापालिकेला प्राप्त ७५ हजार ७०० इतके कोव्हिशिल्डचे डोस प्राप्त झाले होते. ते संपले असून सध्या कोव्हॅक्सिनचे १५ हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने दीड लाख डोसची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपासून सामान्य विक्रेते, दुकानदारांच्या म्हणजेच सुपरस्प्रेडर्सच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काेरोना संसर्ग रोखण्यास वेळीच मदत होणार आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात १६ जानेवारीपासून केारोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला असून तिसऱ्या टप्प्यात ज्येेष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्तांना लसीकरण सुरुवात करण्यात आली. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढू लागल्याने लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढला असून रोजच बहुतांश केंद्रांवर रांगा दिसत आहेत.

नाशिक जिल्ह्याला ७५ हजार ७०० इतके कोव्हिशिल्डचे डोस देण्यात आले होते. त्यापैकी ५४ हजार ५७८ डोसचा महापालिकेचे रुग्णालय व अन्य लसीकरण केंद्रात वापर झाला असून, उर्वरित २१ हजार १२२ डोस महापालिकेच्या २४ तर आणि खासगी रुग्णालयांच्या १८ लसीकरण केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ते देखील संपले आहेत, आता कोव्हॅक्सिनचे १५ हजार डोस अद्याप मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडे शिल्लक आहेत. महापालिकेने दीड लाख डाेसची मागणी नोंदवली आहे, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली.

दरम्यान, महापालिकेने जनसंपर्कात असलेल्या परंतु ज्यांना कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर ती अन्य नागरिकांनादेखील लागण होऊ शकते अशा विक्रेते, दुकानदार, रिक्षाचालक या घटकांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. अँटिजेन आणि आरटीपीसीआर या स्वरूपात ही चाचणी आहे. महापालिका आयुक्तांनी त्यासाठी अगोदरच ५० हजार अँटिजेन टेस्ट किटची मागणी केली हेाती. त्यानुसार भाजी बाजार आणि अन्य बाजारपेठांमध्ये जाऊन चाचण्या करण्यास प्रारंभ झाला आहे.

इन्फो...

महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चाचणी सुरू

नाशिक महापालिकेचे बहुतांश खाते प्रमुख आणि त्यांचा कर्मचारी नगरसेवक, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या संपर्कात असतो अशा सर्वांचीच आता आरटीपीसीआर चाचणी सुरू करण्यात आली असून अगदी सर्व सफाई कामगारांची देखील चाचणी करण्यात येणार आहे.

Web Title: Corona preventive 1.5 million doses will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.