खंडोबाच्या जागरण कार्यक्रमात कोरोनाने घातला "गोंधळ"!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:39 PM2021-03-17T23:39:44+5:302021-03-17T23:54:35+5:30

राजापूर : सध्या लग्नसराईचे दिवस असून, यातील खंडोबाचे जागरण हा अविभाज्य भाग मानला जातो. प्रथेपरंपरेनुसार चालत आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात सध्या कोरोनाने ह्यगोंधळह्ण घातल्यामुळे सर्वाधिक फटका वाघ्यामुरळी या कलाकारांना बसला आहे.

Corona puts "confusion" in Khandoba's awakening program! | खंडोबाच्या जागरण कार्यक्रमात कोरोनाने घातला "गोंधळ"!

खंडोबाच्या जागरण कार्यक्रमात कोरोनाने घातला "गोंधळ"!

googlenewsNext
ठळक मुद्देउपासमारीची वेळ : वाघ्यामुरळी कलावंतांसमोर आर्थिक पेच

राजापूर : सध्या लग्नसराईचे दिवस असून, यातील खंडोबाचे जागरण हा अविभाज्य भाग मानला जातो. प्रथेपरंपरेनुसार चालत आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात सध्या कोरोनाने ह्यगोंधळह्ण घातल्यामुळे सर्वाधिक फटका वाघ्यामुरळी या कलाकारांना बसला आहे.

दरवर्षी खंडोबा महाराज व देवीचा कुलाचार कुलधर्म करून लग्नसराई सुरू होते, परंतु या वर्षी आणखी शासनाच्या नियमानुसार, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने लग्नातील जागरण गोंधळाचा कार्यक्रम आता येथून पुढे बंद ठेवावा लागणार आहे. दि.१५ मार्चपर्यंत कार्यक्रमांना परवानगी होती. त्यामुळे राजापूर येथे जागरण गोंधळ हा कार्यक्रम फिजिकल डिस्टन्सिंग व शासनाच्या नियमानुसार सुरक्षित अंतर ठेवून पार पडला. यात औरंगाबाद येथील नामवंत वाघ्या मंडळी मीराताई चंद्रकांत कावळे यांनी कोरोना महामारीविषयी जागरण गोंधळातून जनजागृतीपर गीतातून केली.
मागील वर्षी लॉकडाऊन व आता शासनाच्या नियमानुसार लग्न, धार्मिक कार्यक्रम यांना बंदी घातल्याने, वाघे मुरळी कलावंतांची आर्थिककोंडी झाली आहे. लोक आता आपले कुटुंब सुरक्षित राहावे, म्हणून जागरण गोंधळाऐवजी घरच्या घरीच चार-पाच माणसांमध्ये दिवट्या साजरा करीत आहेत. त्यामुळे हातावरचे कुटुंब असलेल्या या कलाकारांना पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

ग्रामीण भागात रात्रभर खंडोबा व देवीचा गोंधळ घातला जातो. जागरण गोंधळ घालण्याची ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. आज महाराष्ट्रभर लोककला जागरण गोंधळाच्या परंपरेलाही मोठे स्थान असन, ज्यांच्या घरात शुभकार्य असते, त्यांना प्रथम खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी येथे जावे लागते. तेथून घरी आल्यावर जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यात महाराष्ट्रातील नामवंत वाघ्या मंडळी यांना कार्यक्रमासाठी सुपारी दिली जाते. गोंधळाच्या दिवशी खंडोबा व देवीचा कुलाचार कुलधर्म करून पुढील जागरणाला आरंभ होतो.

शासनाच्या आदेशानुसार आता लग्न सराईत होणारे धार्मिक कार्यक्रम बंद झाले असल्याने, महाराष्ट्रातील बऱ्याच वाघ्या मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचे संकट आल्यामुळे आमच्या जागरण गोंधळ कलाकारांना कोणी आमंत्रित करीत नाही, त्यामुळे या विषाणूचा मोठा फटका आम्हा वाघ्या मंडळींना बसला आहे.
- मीराताई कावळे, प्रदेश अध्यक्ष, वाघ्यामुरळी, औरंगाबाद

Web Title: Corona puts "confusion" in Khandoba's awakening program!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.