कोरोनाने गाठली पुन्हा शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 01:41 AM2022-07-13T01:41:04+5:302022-07-13T01:41:21+5:30
पावसाळा व बदललेल्या हवामानाचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (दि. १२) दिवसभरातून जिल्ह्यात शंभर रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. नाशिक शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही रुग्ण वाढू लागले आहेत.
नाशिक : पावसाळा व बदललेल्या हवामानाचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (दि. १२) दिवसभरातून जिल्ह्यात शंभर रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. नाशिक शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही रुग्ण वाढू लागले आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेता आजमितीला साडेपाचशे रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याचे मानले जात असतानाच जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामागच्या कारणांचा उलगडा होत नसला तरी बदललेले हवामान व पावसाच्या आगमनामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय गर्दीच्या ठिकाणी अद्यापही मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवले जात नसल्यामुळेही रुग्णसंख्या वाढत आहे. मंगळवारी (दि. १२) जिल्ह्यात शंभर रुग्ण आढळून आले. त्यात नाशिक शहरात ५४, ग्रामीण भागात ३८, मालेगावी ६ व पर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे कोरोना पॉझीटीव्हीटीचा दरही नाशिक महापालिका हद्दीत १०.२५ टक्के इतका असून, ग्रामीण भागात २.८४ तर जिल्हा बाहेरील रूग्णांचा दर ११.७६ टक्के इतका आहे. सध्या जिल्ह्यात ५५७ रूग्ण कोरोनाचा उपचार घेत असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.