नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 11:20 PM2021-05-06T23:20:00+5:302021-05-07T01:01:17+5:30

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण जिल्ह्यात थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी घट दिलासादायक ठरत आहेत. त्यातच गेल्या महिनाभरात कोरोनामुक्तीचा दर साडेपाच टक्क्यांनी वाढला असून मालेगाव शहराचीही कोरोनामुक्तीकडे आश्वासक वाटचाल सुरू असल्याचे सुखद चित्र आहे. जिल्ह्यात महिनाभरात एक लाख ३९ हजार रुग्णसंख्या वाढली तर १ लाख ३४ हजार ७८६ रुग्ण कोरोनाला हरवून घरी सुखरूप परतले आहेत.

Corona release rate increased in Nashik district | नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर वाढला

नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर वाढला

Next
ठळक मुद्देदिलासादायक : मालेगाव शहराचीही आश्वासक वाटचाल

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण जिल्ह्यात थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी घट दिलासादायक ठरत आहेत. त्यातच गेल्या महिनाभरात कोरोनामुक्तीचा दर साडेपाच टक्क्यांनी वाढला असून मालेगाव शहराचीही कोरोनामुक्तीकडे आश्वासक वाटचाल सुरू असल्याचे सुखद चित्र आहे. जिल्ह्यात महिनाभरात एक लाख ३९ हजार रुग्णसंख्या वाढली तर १ लाख ३४ हजार ७८६ रुग्ण कोरोनाला हरवून घरी सुखरूप परतले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्यासह प्रशासकीय यंत्रणेच्या चिंता वाढविल्या. रोज वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच ऑक्सिजन बेड व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधावही झाली.

दरम्यान, कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता गावोगावी जनता कर्फ्यू घोषित झाले. कडक निर्बंध लावण्यात आले. परिणामी, रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असून कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात महिनाभरापूर्वी ६ एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या २ लाख ३ हजार २६ इतकी होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ६ मे रोजी रुग्णसंख्या ३ लाख ४२ हजार ९१ वर जाऊन पोहोचली. महिनाभरात जिल्ह्यात १ लाख ३९ हजार ६५ रुग्ण कोरोनाने बाधित झाल्याचे समोर आले. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच कोरोनातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. महिनाभरापूर्वी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ६९ हजार ७७६ इतकी होती. ती आता ६ मे रोजी ३ लाख ४ हजार ५६२ वर जाऊन पोहोचली आहे. महिनाभरात १ लाख ३४ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. महिनाभरापूर्वी कोरानामुक्तीची टक्केवारी ८३.६२ टक्के होती. ती आता ८९.०३ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. एका महिन्यात कोरोनामुक्तीचा दर साडे पाच टक्क्यांनी वधारला आहे. हे एक चांगले सुचिन्ह मानले जात आहे.

महिनाभरात ११९५ जणांचे बळी
जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर समाधानकारक असतानाच गेल्या महिनाभरात ११९५ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना बाधा होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. ६ एप्रिल २०२१ पर्यंत जिल्ह्यात २४९७ रुग्णांचे बळी गेले होते. महिनाभरात ही संख्या ३६९२ इतकी झालेली आहे. दरम्यान, उपचार घेणाऱ्यांमध्येही महिनाभरात ३ हजार ८४ रुग्णांची भर पडलेली आहे. सद्यस्थितीत ३३ हजार ८३७ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: Corona release rate increased in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.