कोरोना उपचाराचे पैसे केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:41+5:302021-05-21T04:16:41+5:30

सायखेडा : चांदोरी येथील रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेले गोदाकाठ कोविड सेंटर येथे उपचारासाठी आलेल्या अनेक गरीब रुग्णांना बरे झाल्यानंतर हलाखीची ...

Corona returned the money for the treatment | कोरोना उपचाराचे पैसे केले परत

कोरोना उपचाराचे पैसे केले परत

Next

सायखेडा : चांदोरी येथील रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेले गोदाकाठ कोविड सेंटर येथे उपचारासाठी आलेल्या अनेक गरीब रुग्णांना बरे झाल्यानंतर हलाखीची परिस्थिती ऐकून त्यांनी डिपॉझिट केलेली रक्कम परत करून माणुसकीचे दर्शन घडविले. गोदाकाठ कोविड सेंटरमध्ये विंचूर येथील सुनीता भिंगारकर या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या. त्यांना गोदाकाठ कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्यांचे नातलग महानुभाव पंथाचे प्रमुख भिंगारकर बाबा यांनी सत्तर हजार रुपये डिपॉझिट म्हणून भरले होते.

दहा दिवस उपचार घेतल्यानंतर सुनीता भिंगारकर कोरोनामुक्त झाल्या, त्यांना घरी सोडवायच्या वेळी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. नातलग पैसे भरत असल्याचे डॉ. उत्तम फडताळे आणि डॉ. विजय गीते यांना समजले. गरीब कुटुंबातील व्यक्ती आणि दुसरे बिल भरत असल्यामुळे आपण या रुग्णाकडून बिल आकारू नये असं त्यांना वाटले. त्यांच्यातील सेवाभावी डॉक्टर जागा झाला, माणसात देव शोधणारे डॉक्टर म्हणून आपले समाजाप्रती काहीतरी देणं लागते या भावनेतून त्यांनी बिल घेतले नाही शिवाय नातलगांनी भरलेले डिपॉझिटदेखील परत केले. यावेळी रुग्णाचे नातेवाईक भारावून गेले होते.

------------------

गोदाकाठ कोविड सेंटर येथे गरीब रुग्णांचे डिपॉझिट परत करताना डॉ. उत्तम फडताळे व इतर. (२० सायखेडा)

===Photopath===

200521\20nsk_19_20052021_13.jpg

===Caption===

२० सायखेडा

Web Title: Corona returned the money for the treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.