कोरोनाच्या धसक्याने शेकडो कोंबड्या रस्त्यावर फेकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 02:14 PM2020-03-11T14:14:17+5:302020-03-11T14:14:57+5:30
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : कोरोनोच्या धसक्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण घाटात शेकडो कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या आहेत.
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : कोरोनोच्या धसक्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण घाटात शेकडो कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या आहेत. नाशिक - जव्हार हा रस्त्यावर ये -जा करणाऱ्या वाहनामधून कोंबड्या फेकल्याचे समजते. कोरोनाने अवघ्या जगाला दहशतीखाली आणले आहे. त्यात जेव्हा लोकांना कळले की बॉयलर कोंबड्या व अंडी यांच्यापासून हा आजार वाढत आहे.तेव्हापासून ग्रामीण भागात लोकांनी बॉयलर कोंबड्या खाणे टाळले आहे. त्यामुळे बॉयलर कोंबड्या उत्पादक व पोल्ट्री फार्मवाल्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सदरील प्रकाराने तोरंगण येथील नागरिकांमध्ये घाबराट पसरली असून यावर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
----------------------
गेल्या काही दिवसात असे लक्षात आले आहे की तोरणंगण घाटात मृत कोंबड्या टाकल्या आहेत. हा प्रकार अत्यंत संताप जनक आहे.
- महेंद्र खोटरे, स्थानिक नागरिक