पोळा सणावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:21 PM2020-08-14T22:21:56+5:302020-08-15T00:25:00+5:30

वर्षभर शेतात राबणाºया आपल्या लाडक्या सर्जाराजाच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला असला तरी यंदा पोळा सणावर कोरोनाचे सावट आहे.

Corona savat on hive festival | पोळा सणावर कोरोनाचे सावट

पोळा सणावर कोरोनाचे सावट

googlenewsNext
ठळक मुद्देआर्थिक संकट : सजावट साहित्य खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ

सायखेडा : वर्षभर शेतात राबणाºया आपल्या लाडक्या सर्जाराजाच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
बळीराजा सज्ज झाला असला तरी यंदा पोळा सणावर कोरोनाचे सावट आहे.
झुली, गोंडे, साखळ्या, बाशिंग आदीची मोठ्या हौसेने खरेदी केली जाते. बरेच शेतकरी पोळ्याचा पंधरा दिवसांपूर्वीच सूत व इतर साहित्य खरेदी करून गोंडे कासरा, वेसण, म्होरकी तयार करतात. यंदा मात्र पोळ्याचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असला तरीही कोरोनामुळे बाजारात साहित्याच्या खरेदीकडे शेतकरी फिरकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, गत चार ते पाच वर्षापासून पोळा सणावर कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचे सावट आसायचे. यंदा पाऊस चांगला झाला असला तरी कोरोनामुळे आनंदावर विरजण पडणार आहे. कोरोनामुळे नागरिकांनी बाहेर न पडता, घरानजिक च कार्यक्रम साजरे करावेत असे आवाहन करण्यात आले आहे
यंदा बैल सजावटीच्या साहित्याच्या किमतीत वीस ते तीस टक्क्याने वाढ झाली आहे. त्यातच कोरोनाचे सावट असल्याने शेतकरी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात दाखल होत नसल्याने विक्रेत्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. आणलेला मालाचे पैसेही कसे सुटणार असा प्रश्न उपस्थित होत असून, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाचे सावट असल्याने पोळ्याच्या सण मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्यता नाही. सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी दुकानाकडे वळत नसल्याने आर्थिक प्रश्न उपस्थित झाला आहे.
- सोपान खालकर, दुकानदार, औरंगपूर

Web Title: Corona savat on hive festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.