ताहाराबादला कोरोना विलगीकरण कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 07:48 PM2021-04-19T19:48:09+5:302021-04-20T00:11:33+5:30
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने येथील न्यू होरिझोन इंग्लिश स्कूलमध्ये कोरोना रुग्णासाठी विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले असून, या केंद्रात पुरुष, महिला यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. येथे ग्रामपंचायत रुग्णांना सर्व आवश्यक सुविधा पुरविणार आहे.
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने येथील न्यू होरिझोन इंग्लिश स्कूलमध्ये कोरोना रुग्णासाठी विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले असून, या केंद्रात पुरुष, महिला यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. येथे ग्रामपंचायत रुग्णांना सर्व आवश्यक सुविधा पुरविणार आहे.
बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, प्रांत विजयकुमार भांगरे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, वैद्यकीय अधिकारी संजीवनी नंदन यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपसरपंच सीताराम साळवे, प्रदीप कांकरिया, डॉ. प्रशांत सोनवणे, सचिन कोठावदे, तात्याभाऊ कासारे, मोठाभाऊ मानकर, निखिल कासारे, मुरलीधर वनिस, राजेश माळी, जीवन माळी, अजय सोनवणे, देवीदास घोडके, राजेंद्र साळवे, कुणाल नंदन, हेमंत नंदन, वैभव नंदन, मिलिंद चित्ते, विशाल सावंत, ग्रामविकास अधिकारी स्वप्निल ठोके व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची कोरोना रुग्ण विलगीकरणासाठी निवड करण्यात आली होती. मात्र शाळेजवळ ग्रामस्थांचे वास्तव्य असल्याने यात बदल करून सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या न्यू होरिझन इंग्लिश स्कूलमध्ये ग्रामपंचायतीतर्फे आता कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.
सरपंच शीतल नंदन यांचे पती योगेश व दीर अरुण नंदन यांनी गावाच्या हितासाठी कोरोना रुग्ण रोज वाढत असल्याने आपल्या मालकीची न्यू होरिझन शाळा तात्काळ विलगीकरण कक्षनिर्मितीसाठी उपलब्ध करून दिली. याठिकाणी सुरुवातीस २० रुग्ण विलगीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास वाढीव उपाययोजना करण्यात येणार आहे. रुग्णांना रोजचे दोनवेळचे जेवण, नाश्ता, चहा, गरम पाणी व दूध-हळद, फळे पुरविण्यात येणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष निर्मितीसोबत ग्रामस्थांनी प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- दिलीप बोरसे, आमदार.