पेठ तालुक्यात कोरोना निवाराकक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:33 PM2020-04-15T23:33:47+5:302020-04-15T23:34:14+5:30
राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाने वाढवलेला लॉकडाउनचा कालावधी यामुळे तालुकास्तरीय प्रशासनाने सतर्कता दाखवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पेठ तालुक्यात पाच ठिकाणी तात्पुरते निवाराकक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
पेठ : राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाने वाढवलेला लॉकडाउनचा कालावधी यामुळे तालुकास्तरीय प्रशासनाने सतर्कता दाखवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पेठ तालुक्यात पाच ठिकाणी तात्पुरते निवाराकक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्या आदेशानुसार तालुक्यातील इनामबारी, बोरवठ, म्हसगण, आसरबारी, पेठ आणि वांगणी येथील शासकीय आश्रमशाळांच्या व शासकीय वसतिगृहाच्या इमारती तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्यात आल्या असून, या ठिकाणी कॉट, वीज, पाणी, स्वच्छतागृह व पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला
आहे.
तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांनी नुकतीच पाचही निवारा कक्षांची पाहणी करून सूचना दिल्या. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, सरोज जगताप, वसंत खैरनार, आदी उपस्थित होते.