कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; चाचणी करून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:23+5:302021-07-29T04:14:23+5:30

कोट... कोरोना आणि डेंग्यू दोन भिन्न गोष्टी असल्या तरी काही लक्षणे सारखी आहेत. ताप हा सर्वात काॅमन भाग असला ...

Corona, similar to the symptoms of dengue; Give it a try! | कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; चाचणी करून घ्या!

कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; चाचणी करून घ्या!

Next

कोट...

कोरोना आणि डेंग्यू दोन भिन्न गोष्टी असल्या तरी काही लक्षणे सारखी आहेत. ताप हा सर्वात काॅमन भाग असला तरी सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष करू नये. बाकी अन्य लक्षणे अत्यंत भिन्न आहेत. डेंग्यूमध्ये प्लेटलेट कमी होतात. रक्तस्त्रावदेखील होतो, रॅश उठतात तसेच रुग्ण बेशुध्द पडू शकतो. कोरोनात तसे होत नाही.

- डॉ. राजेंद्र त्र्यंबके, जीवशास्त्रज्ञ, महापालिका

इन्फो..

चाचणी कुठली?

काेरोना- आरटीपीसीआर (घसा स्त्राव)

डेंग्यू- रक्त तपासणी (रक्तबिंबीका)

इन्फो..

सर्दी, खेाकला व ताप

- कोराना आणि डेंग्यू दोन्ही आजाराचे प्राथमिक लक्षण म्हणजे ताप येणे होय.

- सर्दी, खोकला आणि त्यामुळे होणारी खवखव, किंवा घशात हाेणारा त्रास

- कोरोनामध्ये ताप उतरत नाही आणि दोन तीन दिवस ताप तसाच राहिल्यानंतर चाचणी केली जाते.

- डेंग्यूमध्ये ताप येतो, मात्र प्लेटलेट कमी होऊन अंगावर रॅश येतात.

इन्फो..

पाणी उकळून घ्या, डासांपासून सावध राहा

- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पाणी उकळून आणि गाळून घेतले पाहिजे. तसेच वाफ देखील घेतली पाहिजे.

- डेंग्यू टाळण्यासाठी सर्वप्रथम घराच्या परिसरात पाणी साचू न देणे हे महत्त्वाचे आहे. डासांची उत्पत्ती झाली की लगेचच आजार होऊ शकतो.

- डेंग्यू पसरविणारे डेंग्यू डास हे सामान्यत: शुद्ध पाण्यातच होत असतात. त्यामुळे घरातील साठविलेले पाणी बदलले पाहिजे. पावसाचे पाणी साठू देऊ नये.

इन्फेा...

डेंग्यूचे रूग्ण

२०१९- ११२४

२०२०- ३३६

२०२१- ११०

Web Title: Corona, similar to the symptoms of dengue; Give it a try!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.