केंद्रीय पथकाकडून कोरोना स्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:07+5:302021-04-11T04:15:07+5:30
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गठित केलेल्या केंद्रीय पथकातील सदस्य डॉ. साहिल गोवेल व डॉ. पी.के.वर्मा यांच्या ...
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गठित केलेल्या केंद्रीय पथकातील सदस्य डॉ. साहिल गोवेल व डॉ. पी.के.वर्मा यांच्या पथकाने शनिवारी (दि.१०) कळवण तालुक्याचा दौरा करत उपाययोजनांचा आढावा घेतला. केवळ पाहणी करुन पथक मार्गस्थ झाले असले तरी याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे.
केंद्रीय पथकाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात कोरोना संदर्भात आढावा घेऊन प्रतिबंधित क्षेत्राची खातेनिहाय माहिती घेतली. तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या गावांची माहिती व कोरोनाबाधित रुग्णांची माहिती, कोरोना केअर सेंटर मधील दाखल केलेले रुग्ण, गृह विलगीकरण केलेले रुग्ण व लसीकरण याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली. पथकाने मानूर करोना केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. आरोग्य सेवा व सोयीसुविधा पुरवल्या जातात का तसेच इंजेक्शनच्या साठा उपलब्ध आहे का याची शहानिशा केली. केअर सेंटरमध्ये उपलब्ध असलेले ऑक्सिजन सिलिंडर , उपलब्ध असलेले बेड आणि यंत्रणेने दिलेल्या माहितीची खातरजमाही या पथकाने केली. तसेच नवीबेज प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली व कंटेन्मेंट झोनची पाहणी केली. कोरोना रूग्णाच्या घरी स्टीकर चिटकून पॉझिटिव्हचा दिनांक नमूद करण्याची सूचना करण्यात आली. कोरोनाबाधित नवीबेज गाव साखळी तोडण्यात यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शिंदे,सहायक जिल्ह्याधिकारी विकास मीना, तहसीलदार बी ए कापसे ,गटविकास अधिकरी डी एम बहिरम, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आदी उपस्थित होते..
इन्फो
पीपीई किट विना रुग्णांची पाहणी
केंद्रीय पाहणी समितीने कळवण अभोणा मानूर नवीबेज येथे भेट दिल्या. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, उपलब्ध असलेले कर्मचारी , बेडची संख्या , औषधांचा पुरवठा याबाबत माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांची पाहणी करताना या पथकाने चेहऱ्यावर केवळ मास्क लावलेला होता. पीपीई किट किवा अन्य सुरक्षा साहित्य परिधान केले नव्हते.
फोटो- १० कळवण कोरोना पथक
कळवण येथे पाहणी करताना केंद्रीय पथकातील सदस्य.
===Photopath===
100421\10nsk_48_10042021_13.jpg
===Caption===
फोटो- १० कळवण कोरोना पथककळवण येथे पाहणी करताना केंद्रीय पथकातील सदस्य.