कोरोना सर्वेक्षक वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 09:44 PM2020-06-01T21:44:11+5:302020-06-02T00:47:28+5:30
नांदगाव : शहरात उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबांचे सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांना सुरक्षेविषयक कुठल्याही प्रकारचे कवच देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. आशासेविकांनी आमदार सुहास कांदे यांचे निवासस्थान गाठून आपली भीती व्यक्त केली.
नांदगाव : शहरात उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबांचे सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांना सुरक्षेविषयक कुठल्याही प्रकारचे कवच देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. आशासेविकांनी आमदार सुहास कांदे यांचे निवासस्थान गाठून आपली भीती व्यक्त केली.
शहरात कोरोनाचा एक रु ग्ण दगावला तर आतापावेतो चार बाधित रु ग्ण आढळून आले आहेत.
रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे संपर्क शोधण्यासाठी सर्वेक्षण मोहीम सुरु झाली आहे. तीन दिवसापासून खेड्यापाड्यातून आलेल्या आशा कर्मचारी रणरणत्या उन्हात फिरून सर्वेक्षण करीत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षितेतसाठी तालुका आरोग्य विभागाने कोणत्याही प्रकारचे सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज व तत्सम सुविधा पुरवलेली नाही. सर्वेक्षणाचे काम आटोपले की पुन्हा गावी परत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जात नाही आदी
तक्र ारी त्यांनी आमदार कांदे यांचेकडे मांडल्या.
या प्रकरणी तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांचेकडे विचारणा केली असता, ससाणे यांनी पालिकेची जबाबदारी असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे यंत्रणेतला विसंवाद दसून आला. या सर्व प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी आशा प्रवर्तक व अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांसह बहुतांशी महिला सर्वेक्षकांनी सोमवारी आमदार कांदे यांच्या संपर्क कार्यालयात निवेदन सादर करीत काम बंदचा
इशारा दिला. यावेळी उपस्थित शिवसेनेचे तालुकाप्रमुख व नगरसेवक किरण देवरे यांनी तहसीलदार उदय कुलकर्णी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांच्याशी संपर्क साधला.
निवेदनावर ज्योती जाधव, नलिनी काकळीज, शालिनी चव्हाण, पद्मा बिडवे, योगीता अहिरे, सविता बोरसे, मोनाली चव्हाण, उषा बच्छाव, संगीता बोरसे, स्वाती खैरनार, सविता सागर, योगिनी शिंदे, इंदुमती गायकवाड, शारदा निकम, योगीता देवकर, शीतल आहेर, रोहिणी आहेर, भारती सोनवणे, मनीषा आहेर आदी अंगणवाडी व आशा कर्मचाºयांच्या स्वाक्षºया आहेत.
-------------------------
सुरक्षाकवचाचा खर्च करायचा कुणी?
सुरक्षाकवचाचा खर्च कुणी करायचा यावर अडून बसलेल्या आरोग्याधिकारी अशोक ससाणे यांना आमदार कांदे यांनी खडे बोल सुनावताच सुरक्षा किट खरेदी करतो व मंगळवारी देतो असे ससाणे म्हणाले. दरम्यान आमदार कांदे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेत समन्वय असावा व कठोर उपाययोजना करण्यासाठी शासकीय
आढावा बैठक घेण्याची
सूचना तहसीलदारांना केली आहे.