कोरोनामुळे आदिवासी परिसर धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 10:52 PM2021-05-29T22:52:06+5:302021-05-29T23:56:56+5:30

दिंडोरी : तालुक्यात सध्या द्राक्षबागांची कामे अंतिम टप्प्यात असून, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पेठ, सुरगाणा तालुक्यातील मजूर घराबाहेर पडत नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह जिल्ह्यातील द्राक्षबागेचे वाढीव क्षेत्र असणाऱ्या परिसराला मोठ्या प्रमाणात मजुरांची टंचाई जाणवत आहे. शेतकरी वर्गाची मजूर मिळविण्यासाठी कसरत सुरू असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.

Corona terrorized the tribal area | कोरोनामुळे आदिवासी परिसर धास्तावला

कोरोनामुळे आदिवासी परिसर धास्तावला

Next
ठळक मुद्देदिंडोरी : द्राक्ष बागेच्या कामासाठी मजुरांची टंचाई

दिंडोरी : तालुक्यात सध्या द्राक्षबागांची कामे अंतिम टप्प्यात असून, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पेठ, सुरगाणा तालुक्यातील मजूर घराबाहेर पडत नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह जिल्ह्यातील द्राक्षबागेचे वाढीव क्षेत्र असणाऱ्या परिसराला मोठ्या प्रमाणात मजुरांची टंचाई जाणवत आहे. शेतकरी वर्गाची मजूर मिळविण्यासाठी कसरत सुरू असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.

दिंडोरी तालुक्यासह पेठ व सुरगाणा तालुक्यात जसा-जसा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत गेला, तसा आदिवासी विभागातील मजुरांनी तालुक्यातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे तालुक्यात द्राक्षबागेच्या एप्रिल छाटणीपासूनच सदर मजूर आपल्या घरी गेले असून पेठ व सुरगाणा तालुक्यातील बहुसंख्य गावातील मजूर गावाबाहेर पडू शकत नाही व बाहेर गेल्यास त्यात गावात या लोकांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे दिंडोरी तालुक्यासह अन्य तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र असलेल्या परिसराला मजुरांच्या टंचाईमुळे फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. सर्व द्राक्ष क्षेत्रातील परिसरामध्ये द्राक्षबागेच्या सबकेनचे काम जवळपास आवरले असून बगल फूट, शेंडा मारणे आदी कामे द्राक्ष बागेत चालू असल्याचे दिसत आहे.

द्राक्षउत्पादक अडचणीत
अनेक शेतकरी कोरोना संसर्गामुळे द्राक्षबागेची कामे घरच्या घरी करताना दिसत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणूचा संसर्गामुळे द्राक्षबागांना बाजारभाव न मिळाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे आदिवासी परिसरामध्ये मजुरांना काम नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे .पेठ व सुरगाणा तालुक्यातील अनेक मजूर सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यापासून द्राक्षाच्या कामासाठी बाहेर पडतात. मात्र, सध्याच्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे घरात बसून आहेत.

Web Title: Corona terrorized the tribal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.