शहरात ५३३ शिक्षकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:48+5:302021-01-22T04:14:48+5:30
नववी ते बारावीपर्यंतचे सुरू झाल्यानंतर काेराेना नियमांचे पालन याेग्य हाेत असल्याने कोरोनाचा प्रसार शाळांमधून होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने ...
नववी ते बारावीपर्यंतचे सुरू झाल्यानंतर काेराेना नियमांचे पालन याेग्य हाेत असल्याने कोरोनाचा प्रसार शाळांमधून होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करूनच हे वर्ग सुरू करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेकडून शहरातील शाळांच्या शिक्षक, क्लर्क व शिपाई यांची चाचणी सुरू केली आहे. यात बुधवारी (दि.२०) कोरोना चाचणीसाठी तयार करण्यात आलेल्या यादीतील १ ते ५३ शाळांतील २६५ शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे नियोजन करण्यात आले होते. यात क्लर्क आणि शिपाई मिळून दिवसभरात १४४ पुरुष व १५२ महिला अशा एकूण २९६ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली, तर गुरुवारी यात आणखी भर पडली असून यादीतील ५४ ते १०२ मधील ४९ शाळांमधील २४६ शिक्षकांच्या तपासणीचे नियोजन होते. त्यापैकी २३७ शिक्षकांनी चाचणी करून घेतली. समाज कल्याण विभाग, बिटको रुग्णालय आदी वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन चाचणी करून घेतली. त्यामुळे कोरोना चाचणी केंद्रावर गुरुवारीही शिक्षकांच्या रांगा दिसून आल्या असून, दिवसभरात सुमारे २३७ शिक्षकांची चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल शुक्रवारी (दि.२२) सकाळपर्यंत मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. गुरुवारी झालेल्या चाचण्यांचे रिपोर्ट रविवारी (दि.२४) मिळणार आहेत.
शहरातील शाळा व शिक्षक
एकूण शाळा - ४०५
एकूण शिक्षक - २,६०२
खासगी शाळा - ३०३
खासगी शाळांचे शिक्षक -२,१२७
पालिकेच्या शाळा - १०२
महापालिका शाळांचे शिक्षक ४७५