निफाड नगरपंचायतीच्यावतीने व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:28+5:302021-05-01T04:13:28+5:30
देवचके यांनी सांगितले, गुरुवारी (दि. २९) निफाड येथील ग्रामसंस्कार केंद्रात या कोरोना चाचणी मोहिमेचा शुभारंभ ...
देवचके यांनी सांगितले, गुरुवारी (दि. २९) निफाड येथील ग्रामसंस्कार केंद्रात या कोरोना चाचणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ६० जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने या कोरोना चाचणीसाठी रॅपिड अँटिजेन टेस्टचे ५०० किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तर पुढील रॅपिड अँटिजेन टेस्टचे ५०० किट निफाड नगरपंचायतीच्या वतीने देण्यात येणार आहे. एकूण १००० जणांची कोरोना चाचणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दररोज ५० ते १०० व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी निफाडचे गटविकास अधिकारी संदीप कराड, तालुका कोविड संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे, नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मंडलिक, आरोग्य कर्मचारी, निफाड नगरपंचायतीचे कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे. जास्तीत जास्त दुकानदार व व्यापारी यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. श्रीया देवचके यांनी केले आहे.
इन्फो
कुटुंब सर्वेक्षणही सुरू
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत आशा वर्कर आणि शिक्षक यांचे पथक निफाड शहरात प्रत्येक कुटुंबात सर्वेक्षण करीत असून, या कुटुंबातील संशयित नागरिकांचीसुध्दा कोरोना चाचणी ग्रामसंस्कार केंद्रात करण्यात येत आहे. निफाड नगरपंचायतीचे कर्मचारी हे दुकानदार, व्यापारी यांच्याशी संपर्क करून त्यांना कोरोना चाचणी करण्यासाठी पाठवत आहेत.