कोरोना टेस्टिंग लॅबची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:43 PM2020-04-24T22:43:48+5:302020-04-24T23:44:26+5:30
नाशिक : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या वतीने नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅबला मंजुरी मिळाल्यानंतर डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात टेस्टिंग लॅब कोरोना तपासणीसाठी सज्ज झाली असून, टेस्टिंग किट मिळताच नाशिकमध्ये कोरोनाची टेस्ट करणे शक्य होणार असून, या लॅबमुळे नाशिककरांना जलदगतीने कोरोना तपासणीचे अहवाल प्राप्त होणार आहे.

मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थच्या निकषांनुसार कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली असून जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठीची आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने चाचणीचे आणखी एक मशीन उपलब्ध करून दिले आहे. त्यानंतर या प्रयोगशाळेत अहवालाची पहिली ट्रायलदेखील घेण्यात आली असून, सदर चाचणी अहवाल यशस्वी ठरल्यानंतर पुढील कोरोना संशयितांच्या तपासण्या सुरू करण्यासाठी ही प्रयोगशाळा सज्ज झाली आहे. परंतु तपासणीसाठी आवश्यक असलेले कीट अद्यापही प्रयोगशाळेला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी नाशिकमधील टेस्टिंग लॅब सज्ज असली तरी या लॅबला टेस्टिंग किटची प्रतीक्षा आहे.
-------------
कोरोना टेस्टिंग लॅबची तयारी पूर्ण झाली आहे. आता केवळ शासनाकडून मिळणाऱ्या टेस्टिंग किटची प्रतीक्षा आहे. जिल्हा प्रशासनाकडून ती लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. टेस्टिंग किट मिळताच लॅबमध्ये तपासणी सुरू करण्यास सुरुवात करता येईल.
- डॉ. मृणाल पाटील, अधिष्ठाता, डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालय