लस घेण्यापूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:14 AM2021-05-14T04:14:39+5:302021-05-14T04:14:39+5:30
पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय तसेच रेड क्रॉस या ठिकाणी गुरुवारी सकाळपासून नाशिक मनपा व भारतीय जैन संघटना यांच्या सहकार्याने ...
पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय तसेच रेड क्रॉस या ठिकाणी गुरुवारी सकाळपासून नाशिक मनपा व भारतीय जैन संघटना यांच्या सहकार्याने लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अँटिजन चाचणी सुरू केली आहे. लसीकरण केंद्रावर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने त्यातच शासनाकडून कमी प्रमाणात लस डोस येत असल्याने डोस कमी व नागरिक जास्त असे चित्र निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून वाद होतात. त्यातच नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांना सूचना दिल्यानंतरही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना पाचारण करावे लागत आहे. नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना म्हणून आता पंचवटी मनपा प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सुरुवातीला कोरोना अँटिजन चाचणी करणे बंधनकारक असून चाचणीचा अहवाल नकारात्मक आला तर लस घेता येईल आणि चाचणी सकारात्मक आल्यास त्या रुग्णाला उपचारासाठी मेरी कोविड सेंटरला रवाना केले जाणार आहे.