कोरोनाने वृक्षरोपणाचे महत्त्व अधोरेखित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:37+5:302021-07-21T04:11:37+5:30

विजय करजंकर : मऱ्हळ ग्रामस्थांचा प्रेरणादायी उपक्रम नांदूरशिंगोटे : कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे ...

Corona underscores the importance of tree planting | कोरोनाने वृक्षरोपणाचे महत्त्व अधोरेखित

कोरोनाने वृक्षरोपणाचे महत्त्व अधोरेखित

Next

विजय करजंकर : मऱ्हळ ग्रामस्थांचा प्रेरणादायी उपक्रम

नांदूरशिंगोटे : कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी एक निसर्गरम्य वातावरण तयार होणे, ही काळाजी गरज आहे. वृक्षारोपण व त्यांंच्या संगोपनाची मंडळाने व ग्रामस्थांनी घेतलेली जबाबदारी निश्चितच प्रेरणादायी आहे. आगामी काळात प्रत्येकाने आपापल्या घरापुढे एक झाड लावून त्याची निगा राखणे गरजेचे आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करजंकर यांनी केले.

सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ खुर्द येथे झालेल्या वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच सुजाता घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करजंकर, उदय सांगळे, दीपक बर्के, दीपक खुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड, विजय आढाव, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज सांगळे, उपसरपंच अशोक पवार, विकास संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कुटे, उपाध्यक्ष चिंतामण कुटे, जय मल्हार मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ कुटे, पोलीस पाटील संदीप कुटे, शिवाजी घुगे आदीसह मान्यवर उपस्थित होते.

-------------------------

मऱ्हळ खुर्द येथे ग्रामस्थांच्या पुढाकारातून वृक्षरोपण करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय करजंकर, राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, सुजाता घुगे, दीपक बर्के, सागर कोते, अनिल आव्हाड, विजय आढाव, ज्ञानेश्वर सांगळे, संदीप कुटे, पंढरीनाथ कुटे, शिवाजी घुगे आदी. (२० मऱ्हळ)

200721\20nsk_7_20072021_13.jpg

२० मऱ्हळ

Web Title: Corona underscores the importance of tree planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.