वाजगाव येथे कोरोना लसीकरण मोहीम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:10+5:302021-04-10T04:14:10+5:30

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण मोहीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वैद्यकीय अधिकारी अलका ...

Corona vaccination campaign started at Vajgaon | वाजगाव येथे कोरोना लसीकरण मोहीम सुरु

वाजगाव येथे कोरोना लसीकरण मोहीम सुरु

Next

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण मोहीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वैद्यकीय अधिकारी अलका सपकाळे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली. दिवसभरात १५५ व्यक्तिंना लसीकरण करण्यात आले. गावासह देवळा तालुक्यात सध्या कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात दररोज शंभरहून अधिक रुग्ण सापडत आहेत तर वाजगाव येथे दरडोई पाच नवीन रुग्ण आढळत असल्याने वाजगाव गावातील एकूण बाधितांची रुग्णसंख्या लवकरच शंभरी पार करेल. सध्या गावात ३२ रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. गावातील कोरोनाबाधित रूग्णांपैकी काही अपवाद वगळता बहुतांशी रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. गावात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रीतम आहेर, आरोग्यसेवक प्रशांत सोनवणे, आरोग्यसेविका मीनाक्षी पगार, उपसरपंच दीपक देवरे, विनोद देवरे, देवराम देवरे, पोलीसपाटील निशा देवरे, अमोल देवरे, ग्रामविकास अधिकारी जे. व्ही. देवरे, दीपक जाधव, सुरेखा आहेर, ज्योती आहेर, ज्योती केदारे, प्रमिला मगर, समीर बच्छाव आदी उपस्थित होते.

-------------

वाजगाव येथे कोरोना लसीकरणाचा प्रारंभ आरोग्य अधिकारी अलका सपकाळे, डॉ. प्रीतम आहेर आदींच्या उपस्थितीत झाला. (०९ वाजगाव)

===Photopath===

090421\09nsk_2_09042021_13.jpg

===Caption===

०९ वाजगाव

Web Title: Corona vaccination campaign started at Vajgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.