अधरवड येथे कोरोना लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 06:02 PM2021-04-17T18:02:49+5:302021-04-17T18:05:37+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील प्राथमिक उपकेंद्रात दि.१६ रोजी कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील प्राथमिक उपकेंद्रात दि.१६ रोजी कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.
उद्घाटन सरपंच ज्ञानेश्वर डमाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज गुप्ता, नवनाथ बऱ्हे, उमेश बऱ्हे,माजी सरपंच बहिरू गांगड, पंढरीनाथ बऱ्हे,धनाजी बऱ्हे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होते. या केंद्रात ४५ वयोगटाच्या पुढील एकूण ८० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी एम. टी. देशमुख यांनी येथे भेट देऊन कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. टाकेद व अडसरे बुद्रुक या उपकेंद्रांवरही पुढील आठवड्यात कोरोना लसीकरण मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती डॉ. गुप्ता यांनी दिली.