शिवाजीनगरला कोरोना लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:14 AM2021-04-01T04:14:52+5:302021-04-01T04:14:52+5:30
------------- मानोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी दरम्यान असणाऱ्या मानोरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य ...
-------------
मानोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी दरम्यान असणाऱ्या मानोरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा रस्त्याची डागडुजी केली जात नाही.
------------
हिवरगावला गाळउपशास प्रारंभ
सिन्नर : तालुक्यातील हिवरगाव येथे युवा मित्र संस्थेच्या पुढाकारातून पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली. संचालिका मनीषा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
--------------
शहरात उन्हाचा पारा वाढला
सिन्नर : आठवड्याभरात तापमानामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने शहरात उन्हाचा पारा वाढला आहे. दुपारच्या वेळी रसवंतीगृहे, शीतपेयांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनामुळे दुपारी नागरिक फारसे रस्त्यावर दिसत नाहीत.
--------------
दुशिंगपूर बंधाऱ्यातील अवैध पाणीउपसा बंद
सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ठेकेदाराकडून दुशिंगपूर पाझर तलावातून सुरू असलेला अवैध पाणीउपसा तत्काळ बंद करण्यात आला आहे. अवैध पाणीउपशाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण केले होते. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
----------------
कोविड रुग्णालयास साहित्य भेट
सिन्नर : अॅडव्हान्स एन्झाइम कारखान्याकडून सिन्नर ग्रामीण रुग्णालयास आठ लाख ५० हजार रुपये किमतीचे औषधी साहित्य भेट देण्यात आले. रुग्णांना अत्यावश्यक अशा साहित्याची भेट देण्यात आली.