कोरोना लसीकरण जनजागृतीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:54 PM2021-02-18T17:54:08+5:302021-02-18T17:58:48+5:30

नांदूरवैद्य : भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय यांच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो यांच्यावतीने आनंदतरंग लोककला संचाचे शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांचे आत्मनिर्भर भारत व कोरोना लसीकरण जनजागृतीपर समाजप्रबोधनाचे कार्यक्रम महाराष्ट्राभर राबवणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवारी (दि.१८) इगतपुरी तालुक्यात आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

Corona vaccination initiates public awareness | कोरोना लसीकरण जनजागृतीस प्रारंभ

आत्मनिर्भर भारत व कोरोना लसीकरण जनजागृती अभियानाचा चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करतांना हिरामण खोसकर समवेत डॉ. लता गायकवाड, निर्मला गायकवाड, सोमनाथ जोशी, परमेश्वर कासुळे व इतर.

Next
ठळक मुद्देइगतपुरी : आनंदतरंग कलापथकाकडून लोकजागर

नांदूरवैद्य : भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय यांच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो यांच्यावतीने आनंदतरंग लोककला संचाचे शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांचे आत्मनिर्भर भारत व कोरोना लसीकरण जनजागृतीपर समाजप्रबोधनाचे कार्यक्रम महाराष्ट्राभर राबवणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवारी (दि.१८) इगतपुरी तालुक्यात आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

आत्मनिर्भर भारत व कोरोना लसीकरण अभियान जनजागृती महाराष्ट्र व गोवा येथे होणार असून त्यासाठी १६ चित्रर तयार करण्यात आले आहेत.. नाशिक, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरगाणा, कळवण, येवला, मालेगाव, बागलाण या १० तालुक्यात दि.१५ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत एकुण ५२ गावात आत्मनिर्भर भारत व कोरोना लसीकरण जनजागृती होणार असल्याचे असल्याचे शाहीर गायकर यांनी सांगितले.
यावेळी आनंदतरंग कलापथकातील कलाकारांनी कोरोना लसीकरणाविषयी जनजागृती करतांना लसीकरण कोणाकडून घ्यावे, कशी घ्यावे, तसेच सुरूवातीस लस कोणाला मिळणार आदींचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी सोमनाथ जोशी, डॉ.लता गायकवाड, निर्माला गायकवाड- पेखळे, परमेश्वर कासुळे, प्राचार्य भाबड, गिरी आदी उपस्थित होते.
 
Web Title: Corona vaccination initiates public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.