सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 09:17 PM2021-01-28T21:17:36+5:302021-01-29T00:40:27+5:30
सुरगाणा : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती सभापती मनीषा महाले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कोविड लसीकरणाचे प्रथम मानकरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप संभाजी रणवीर हे ठरले. तर महिलांमध्ये आशा स्वयंसेविका चांगुणा गावित या लसीकरणाच्या पहिल्या मानकरी ठरल्या.
Next
ठळक मुद्देआशा स्वयंसेविका चांगुणा गावित या लसीकरणाच्या पहिल्या मानकरी
सुरगाणा : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती सभापती मनीषा महाले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कोविड लसीकरणाचे प्रथम मानकरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप संभाजी रणवीर हे ठरले. तर महिलांमध्ये आशा स्वयंसेविका चांगुणा गावित या लसीकरणाच्या पहिल्या मानकरी ठरल्या.
याप्रसंगी आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आशा पर्यवेक्षक आदी उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर यांना कोरोना लस देऊन लसीकरण सत्राची सुरुवात करण्यात आली. कोरोना लसीकरण मोहिमेत सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.