सोनांबे येथे ज्येष्ठांसाठी कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:04+5:302021-04-10T04:14:04+5:30
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथे गावातील ६० वर्षांवरील ग्रामस्थांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुरूवारी (दि. ...
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथे गावातील ६० वर्षांवरील ग्रामस्थांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुरूवारी (दि. ८) सरपंच डॉ. रवींद्र पवार, डॉ. दुर्वास जाधव यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
पहिली लस गावातील ज्येष्ठ निवृत्ती नामदेव पवार यांना देण्यात आली. यावेळी डॉ. दिवटे, आरोग्यसेविका पाटील, आशा सेविका, टी. आर. पवार, रामनाथ डावरे, शरद रत्नाकर, युनूस शेख, भाऊसाहेब पवार, दामू बोडके, संजय बोडके, ज्ञानेश्वर बोडके, टी. डी. जगताप, उपसरपंच संतोष डगळे, सदस्य भगवान पवार, योगेश पवार, सोमनाथ पवार, विकास पवार, सुभाष जोरवे, विकास पवार आदी उपस्थित होते. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या ग्रामस्थांसाठी पुन्हा लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती सरपंच डॉ. रवींद्र पवार यांनी दिली.