ऑनलाइन नोंदणी करूनही कोरोना लस मिळाली नाही; ज्येष्ठ नागरिकाची कर्मचाऱ्याला धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 11:18 AM2021-03-10T11:18:42+5:302021-03-10T11:19:26+5:30
corona vaccination : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील घटना आहे. अशोककुमार भाटिया यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : कोरोना लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. ऑनलाईन नोंदणी करूनही केंद्रावर आल्यावर लस न मिळाल्याने एका ज्येष्ठ नागरिकाने लसीकरण केंद्रावर गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. या ज्येष्ठ नागरिकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील घटना आहे. अशोककुमार भाटिया यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित कर्मचाऱ्याने भाटिया यांनी गोंधळ घालत आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. तसेच या धक्काबुक्कीत जखमी झाल्याची तक्रारही केली आहे. ऑनलाइन नोंदणी करून देखील लस उपलब्ध झाली नसल्याने भाटिया संतापले होते. यावेळी लसीकरण केंद्रावर समन्वय आणि नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले.