Corona Virus : कोरोनाच्या निर्बंधात 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ, केंद्र सरकारचा आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 05:19 PM2021-10-28T17:19:39+5:302021-10-28T17:21:04+5:30
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये केंद्र सरकारने 28 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून कोविड संदर्भातील निर्बंधांचे आदेश जारी केले आहेत.
नवी दिल्ली - देशात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असून मिशन बिगेन अंतर्गत सर्वच उद्योग आणि कारभार सुरू झाला आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याचे केंद्र सरकारने कोविड 19 च्या नियमावलींचे पालन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना आणि नागरिकांना दिले आहेत. त्याचा पार्श्वभूमीवर कोविड संदर्भातील नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असून केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत कोविडचे निर्बंध वाढवले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये केंद्र सरकारने 28 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून कोविड संदर्भातील निर्बंधांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, आरोग्य मंत्रालयाच्या 21 सप्टेंबर 2021 च्या आदेशाचे पालन यापुढेही करणे बंधनकारक असणार आहे. केंद्राचे सचिव अजय कुमार भाला यांच्या सहीने हे पत्रक जारी करण्यात आले आहे. यापूर्वी 28 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून सरकारने 30 ऑक्टोबर पर्यंत कोविडचे निर्बंध वाढवले होते. आता, हे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहेत.
#IndiaFightsCorona:#COVID19 | ध्यान रहे, आँखों से #कोरोनावायरस दिखाई नहीं देता इसका मतलब यह नहीं है कि वायरस होता नहीं हैं।
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) October 28, 2021
कोरोनावायरस से सुरक्षित रहने के लिए कोरोना नियमों का पालन करें!#Unite2FightCorona#StaySafe@MoHFW_INDIA@mansukhmandviyapic.twitter.com/0ohjec1jXa
दरम्यान, सध्या देशभरात सण-उत्सवाचे वातावरण असून दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यामुळे, बाजारातही गर्दी वाढत असून सार्वजनिक ठिकाणी लोकांची वर्दळ दिसत आहे. त्यामुळेच, सरकारने कोविड संदर्भातील निर्बंध कायम ठेवले असून सार्वजनिक कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने यांना बंदीच असणार आहे.