गोंदे दुमाला येथील ग्रामस्थांच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 03:28 PM2020-10-17T15:28:57+5:302020-10-17T15:29:26+5:30
नांदूरवैद्य : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गाने नागरिकांना हैराण करून सोडले असून या पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा देत आरोग्याची तपासणी करत दिलासा देणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील उपकेंद्राच्या आरोग्यसेविका श्रीमती मेदडे व आशासेविका या कोरोना योद्धांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.

कोरोनाच्या काळात गोंदे दुमाला येथे घरोघरी जात थर्मामीटरद्वारे तपासणी करत गोंदे दुमाला येथील नागरिकांची काळजी घेत जनजागृती करत असतांनाच प्रत्येक नागरिकास आरोग्याची काळजी घेण्यासाठी आशासेविकांसह श्रीमती मेदडे यांनी मेहनत घेतली आहे.
एक महिन्यांपूर्वी गोंदे दुमाला येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या काळात देखील या कोरोना योद्धांनी संपूर्ण गाव पिंजून काढत घरोघरी जाऊन आॅक्सीमीटर तसेच थर्मल तपासणी करत लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तीस एकलव्य आधार आश्रमात पाठवून त्या ठिकाणी योग्य ते उपचार दिले जात होते. म्हणूनच गावाच्या हितासाठी व आरोग्याची काळजी घेणाºया कोरोना योद्धांचा ग्रामस्थांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी गोंदे आरोग्य केंद्राचे गोंदे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अशोक नाठे, दत्तू नाठे, संदीप नाठे, डॉ. तळपाडे, नामदेव जाधव, साहेबराव मुसळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गोंदे दुमाला येथे कोरोना योद्धांचा सत्कार अशोक नाठे समवेत श्रीमती मेदडे, मेदडे, संदिप नाठे व ग्रामस्थ.