डांगसौंदाणेच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 02:15 PM2020-12-16T14:15:40+5:302020-12-16T14:16:44+5:30

सटाणा : बागलाण तालुका कोरोना हॉटस्पॉट ठरला असताना डांगसौंदाणे येथील समर्पित कोरोना केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून १९२ रुग्णांना कोरोनामुक्त केले, याची दखल घेऊन महाराष्ट्र निसर्ग पर्यावरण संस्थेतर्फे या कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.

Corona Warriors felicitated at Dangsaundane Rural Hospital | डांगसौंदाणेच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना योद्ध्यांचा सत्कार

डांगसौंदाणेच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना योद्ध्यांचा सत्कार

googlenewsNext

डांगसौंदाणे येथे समर्पित कोरोना केंद्र कार्यान्वित करण्यात आले. इतर तालुक्यांच्या तुलनेने या तालुक्याचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे डांगसौंदाणे येथील केंद्रात तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील विलगीकरण , कोरोना केंद्र व खासगी रुग्णालयाकडून संदर्भित संशयित , बाधित व गंभीर रुग्णांवर वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप घोंगडे ,डॉ. चौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त केले. वैद्यकीय अधीक्षक या नात्याने रुग्णालयाची धुरा डॉ. घोंगडे यांच्याकडे असून ते बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश चौरे व इतर वैद्यकीय अधिकारी, डॉ. रुपेश खैरनार, डॉ. राहुल खैरनार , डॉ. दिनेश पंचभाई , डॉ. कुणाल मोरे , डॉ. अश्विनी देवरे , डॉ. राजश्री भामरे ,डॉ. स्वाती खैरनार, डॉ. विश्वास देवरे, डॉ. वीरेंद्र आवारी यांची साथ मिळाली . रुग्णसेवेच्या कामात शुश्रूषा संवर्गातील ज्योती महाजन, आम्रपाली बोरसे, हेमंत देवरे , करणकुमार शेवाळे, सायली निकम, प्रज्ञा महिरे यांचे मोलाचे योगदान लाभले होते.कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना डॉ. घोंगडे , डॉ. चौरे ,डॉ. देवरे व क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तरीदेखील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ते चौघेही नव्या जोमाने सेवा बजावत आहेत .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर व मास्क वापरुन बुधवारी (दि. १६) पार पडलेल्या गौरव समारंभात प्रातिनिधिक स्वरुपात डॉ .घोंगडे यांचा महारष्ट्र निसर्ग पर्यावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जलतज्ज्ञ डॉ. किशोर कुंवर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र , पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देवून तर , शुश्रुषा संवर्ग, तांत्रिक संवर्ग प्रशासन विभाग व स्वच्छता कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येकी एकाला गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी शुश्रुषा संवर्गातील अधिपरिचारिका ज्योती महाजन, करणकुमार शेवाळे, प्रज्ञा महिरे , सायली निकम, सुवार्ता देसाई, उखडी देसाई ,रेखा बहिरम , सुरेखा पाडवी, कार्यालयीन अधिक्षक महेंद्र महाले , विकास थोरात, संतोष दुसाने, रवी शिंदे, भास्कर ठाकरे ,संगीता शिंदे ,संतोष मोरे , योगेश बर्डे , कांतीलाल पवार या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Corona Warriors felicitated at Dangsaundane Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.