डुबेरे येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:37+5:302021-02-05T05:49:37+5:30
घोरवड येथे जवानांचा सन्मान सिन्नर : तालुक्यातील घोरवड येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जवानांचा सन्मान करण्यात आला. भारतीय सैनिक पंढरीनाथ ...
घोरवड येथे जवानांचा सन्मान
सिन्नर : तालुक्यातील घोरवड येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जवानांचा सन्मान करण्यात आला. भारतीय सैनिक पंढरीनाथ हगवणे, ऋषिकेश हगवणे, सचिन घोडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पुढील पाच वर्षे एकत्र येऊन गावाचा विकास करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू, गावाचे नाव राज्यपातळीवर नेऊ, असे अभिवचन देऊन वटवृक्षाचे रोपण यावेळी करण्यात आले. यावेळी प्रशासक कैलास भदाणे, अलका माळी, रमेश हगवणे, अंबादास भुजबळ, अर्जुन लहामटे, विकास तळपे, अर्चना हगवण, विनायक हगवणे, रामदास हगवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वाजे विद्यालयात संविधान उद्देशिका वाचन
सिन्नर : येथील लोकनेते वाजे विद्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. मविप्रचे संचालक हेमंत वाजे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली. उपशिक्षक आर.व्ही. वाजे यांनी संविधान वाचन केले. मुख्याध्यापक बी.आर. कहांडळ यांनी प्रास्तविक केले. यावेळी भाऊसाहेब गोजरे, डॉ.विजय लोहारकर, प्रसाद हांडोरे, मनीष गुजराथी, एस.आर. आव्हाड, किशोर जाधव यांच्यासह शिक्षक व नागरिक उपस्थित होते.
पाडळी येथे विद्यार्थिनींना सायकल वाटप
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. १४व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने विद्यार्थिनींना सायकल खरेदी केल्या आहेत. त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव प्रा.टी.एस. ढोली, हिरामण आगिवले, अरुण गरगटे, बी.आर. चव्हाण, आर.व्ही. निकम, एस.एम. कोटकर, आर.टी. गिरी, एम.सी. शिंगोटे यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कृषी महोत्सवात मार्गदर्शन
सिन्नर : तालुक्यातील आडवाडी येथे कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. शेतातील मातीची ताकद वाढविण्यासाठी रासायनिक औषधांना पर्याय म्हणून गोमूत्र, शेणखत यांचा वापर केला, तर शेतकरी स्वावलंबी होईल, असे प्रतिपादन आबासाहेब मोरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, जयराम शिंदे, बाळासाहेब ठोक, सचिन गुंजाळ, रतन हांडोरे यांच्यासह मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.