औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 06:33 PM2021-06-29T18:33:03+5:302021-06-29T18:33:45+5:30
सायखेडा : परिसरातील औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या गोदाकाठच्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रंगनाथ सातपुते होते.
सायखेडा : परिसरातील औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या गोदाकाठच्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रंगनाथ सातपुते होते.
यावेळी सलग दीड वर्ष एकही दिवस हॉस्पिटल बंद न ठेवता कमी खर्चात हजारो रुग्ण बरे करून निफाड तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी आरोग्य दूत ठरलेले डॉ. प्रल्हाद डेर्ले तसेच डॉ. मधुकर घुले, डॉ. संजय खालकर, भेंडाळी उप आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका मोरे यांच्यासह घरोघरी जाऊन अनेक वेळा होम क्वॉरंटाईन रुग्णांची दररोज तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासण्याचे गाव पातळीवर कार्य करणाऱ्या आशा कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांना निफाड पंचायत समितीच्या सभापती सुलभा पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आपल्या जीवावर उदार होऊन हजारो रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या आणि शहरी भागातील दवाखान्यापेक्षा अल्प दरात रुग्ण सेवा तसेच घरोघर जाऊन तपासणी करणाऱ्या आशा कर्मचारी ह्या खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आहेत, अशा शब्दांत सभापती पवार यांनी कोरोना योद्ध्यांचा गौरव केला.
यावेळी पंचायत समिती सभापती सुलभा पवार, सामाजिक कार्यकर्ते शहाजी राजोळे, भाऊसाहेब कमानकर, खंडू बोडके, भारती चव्हाण, अमीना इनामदार, सोमनाथ खालकर, दीपक कमानकर, भाऊसाहेब खालकर, रामा आढाव, शाम खालकर, रामदास खालकर, अन्वर शेख, ज्ञानेश्वर रोडे, भगवान चव्हाण, अरिफ इनामदार, शांताराम कुरणे, सचिन माने, नवनाथ खालकर, लक्ष्मण खालकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.