कोरोना आटोक्यात येईना, तरी बाजारात गर्दी मावेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:36+5:302021-04-30T04:17:36+5:30
किराणा मालाची दुकाने, पेट्रोल पंप, खाद्यपदार्थांची दुकाने, मेडिकल, बँका आदी ठिकाणी लोकांची झुंबड उडत आहे. बाजारपेठांना अक्षरशः जत्रेचे स्वरुप ...
किराणा मालाची दुकाने, पेट्रोल पंप, खाद्यपदार्थांची दुकाने, मेडिकल, बँका आदी ठिकाणी लोकांची झुंबड उडत आहे. बाजारपेठांना अक्षरशः जत्रेचे स्वरुप येत आहे. अनेकांच्या तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही. सॅनिटायझरचा वापर होताना दिसत नाही. नागरिक कोरोना आजाराचे गांभीर्य विसरल्यासारखे रस्त्यावर बेछूटपणे येत आहेत. खरेदीसाठी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून एकतर वेळ वाढवावी, अन्यथा घरपोच सेवा देण्याची व्यवस्था करावी असे तज्ज्ञांचे मत आहे.
जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात देखील कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढला असून अक्षरशः कोरोनाचा विस्फोट होतांना दिसतोय. यामुळे कोरोनाची दुसरी लाट अटोक्यात येण्यासाठी शासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, ‘मिशन ब्रेक द चेन’च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदीसह कडकडीतपणे बंद पाळण्यात येत आहे.
प्रशासनाला कोरोना साखळी तोडायची आहे, की तशीच कायम चालू ठेवायची आहे, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात न येणारी गोष्ट आहे, अकरानंतर रस्त्यावर प्रचंड शांतता असते; परंतु आधी दोन-तीन तास झालेली गर्दी कोरोनाला टाळू शकत नाही. कोरोना वेळ सांगून समाजात फिरत नाही, हे प्रशासनाने लक्षात घेण्याची बाब आहे. एकीकडे दुसर्या लाटेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासन पूर्णपणे गोंधळून गेले आहे. ग्रामीण भागातील नागरिक उन्हाळ्याची सुटी लागल्यासारखे निर्धास्तपणे वावरताना दिसत आहेत.
-----------
स्थानिक प्रशासनाने शहरातून व बाहेरगावातून आलेल्या लोकांची यादी तयार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात लोकांना हटकल्यास वाद-विवाद होतानांचे चित्र सर्वत्र दिसत आहेत. शहरातून येणाऱ्या लोकांवर कसलेही बंधन नाही आणि तेच कोरोना वाढीस निमंत्रण देत आहे. कोरोना साखळी तोडायची झाल्यास नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. (२९ जळगाव निंबायती)
===Photopath===
290421\29nsk_10_29042021_13.jpg
===Caption===
२९ जळगाव निंबायती