खरिपाला कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 09:23 PM2020-06-02T21:23:10+5:302020-06-03T00:11:39+5:30
नायगाव : संपूर्ण जगाला हैराण करणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच उद्योगक्षेत्राची चाके थांबली होती. अशा बिकट परिस्थितीतही न थांबलेल्या कृषिक्षेत्रात मात्र लॉकडाउननंतर अवकळा सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कोबी, टमाट्याच्या पिकाकडे शेतकरी पाठ फिरवत असल्याने यंदाच्या खरीप हंगामाला कोरोनाची बाधा भोवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
नायगाव : (दत्ता दिघोळे) संपूर्ण जगाला हैराण करणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच उद्योगक्षेत्राची चाके थांबली होती. अशा बिकट परिस्थितीतही न थांबलेल्या कृषिक्षेत्रात मात्र लॉकडाउननंतर अवकळा सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कोबी, टमाट्याच्या पिकाकडे शेतकरी पाठ फिरवत असल्याने यंदाच्या खरीप हंगामाला कोरोनाची बाधा भोवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
भारतासह सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. लाखो लोकांचा जीव घेणाºया या रोगाने जगातील सर्वच उद्योगधंद्दे बंद पाडले. कोट्यवधी लोकांना बेरोजगार करणाºया या विषाणूने संपूर्ण
जगाची आर्थिक कोंडी केली आहे. अशा भयानक व जीवघेण्या परिस्थितीत फक्त जगाच्या पोशिंद्याची कंपनी (शेती) मात्र अविरतपणे सुरूच होती.
------------------
कृषिक्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
१ शेतकºयांनी या काळात मोठ्या धाडसाने शेतमालाची विक्री केली. मात्र या काळातही बळीराजाच्या कष्टाला अपेक्षित मोल मिळाले नाही. संपूर्ण देश सध्या पाचव्या लॉकडाउनमधून मार्गक्र मण करत असला तरी मोठ्या प्रमाणात मिळालेल्या अटी-शर्तीच्या जोरावर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योग पुन्हा पटरीवर येत असताना मात्र कृषिक्षेत्रात सध्या अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिना सुरू झाला असला तरी शेतकरी अजूनही खरिपाच्या कोबी, टमाटे, मिरची, फ्लावर आदी लागवडीच्या पिकांच्या तयारीला लागलेला दिसत नाही.
--------------------
२ कोरोनाचा प्रसार थांबत नसल्यामुळे येणाºया काळातही त्याचा फैलाव सुरूच राहिला तर शेतमालाची निर्यात व बाहेरील व्यापारी येणार नाही अशा विविध अफवा पसरत असल्यामुळे या पिकांच्या विक्र ीवर परिणाम होऊन शेतमालाचे हाल होणार अशी चर्चा (अफवा) सध्या विविध माध्यमातून फिरत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे या महागड्या पिकांची लागवड करण्यास धजावत नसल्याचे चित्र सिन्नर तालुक्यात विशेषत: नायगाव खोºयात बघायला मिळत आहे.
-------------------------
३ खरीप हंगामाला सुरुवात झाली असली तरी यंदा कोबी, टमाटे, फ्लावर, मिरची आदी खर्चीक पिकांच्या लागवडीकडे शेतकरी पाठ फिरवत असल्याने आगामी काळात सोयाबीन, बाजरी, भुईमूग आदी कमी उत्पादन खर्च लागणाºया पिकांची चाचपणी करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
-----------------------
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी येणाºया काळात या रोगाचा कोणत्याही शेती पिकावर किंवा विक्र ीवर त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता खरिपातील कोबी, फ्लावर, टमाटे, मिरची आदी पिकांची लागवड करावी. सर्व जगातील उद्योग थांबले असताना एकमेव शेती व्यवसाय सुरू होता. सध्यातर सर्वच व्यवहार सुरळीत झाले असताना शेतकºयांनी अफवांवर विश्वास न ठेवता वरील सर्वच पिकांची लागवड करावी.
- गणेश कांगणे, संचालक,
कांगणे नर्सरी. दोनवाडे, नाशिक
---------------------------------
जून महिना सुरू झाला तरी अजूनही कोबी, टमाटे, मिरची आदी पिकांच्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी येण्याचे प्रमाण कमीच आहे. येणाºया काळात कोरोनावर प्रभावी औषध मिळेल व सर्वकाही व्यवस्थित होईल. शेतकºयांनी अफवांवर विश्वास न ठेवता पिकांचे नियोजन केल्यास फायदाच होईल.
- श्याम कातकाडे, संचालक,
गोदावरी कृषी सेवा केंद्र, नायगाव