जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:19 PM2020-07-29T23:19:22+5:302020-07-30T01:46:11+5:30

नाशिक : जिल्ह्यात बाधितांइतकेच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणदेखील आठवड्याभरापासून वेगाने वाढले आहे. त्यामुळेच दिवसभरात बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण कधी दुपटीने तर कधी तिपटीने अधिक येत आहे. प्रारंभीचे पाच हजार कोरोनाबाधित बरे होण्यास ३ महिन्यांचा कालावधी, तर नंतरचे पाच हजार कोरोनामुक्त होण्यास अवघा महिनाभराचा कालावधी लागला आहे.

Coronary artery disease doubles in the district! | जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ!

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ!

googlenewsNext
ठळक मुद्देदस हजारपूर्ती : प्रारंभीचे पाच हजार रुग्ण कोरोनामुक्त होण्यास तीन महिन्यांचा कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात बाधितांइतकेच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणदेखील आठवड्याभरापासून वेगाने वाढले आहे. त्यामुळेच दिवसभरात बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण कधी दुपटीने तर कधी तिपटीने अधिक येत आहे. प्रारंभीचे पाच हजार कोरोनाबाधित बरे होण्यास ३ महिन्यांचा कालावधी, तर नंतरचे पाच हजार कोरोनामुक्त होण्यास अवघा महिनाभराचा कालावधी लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण २९ मार्चला लासलगावला सापडल्यानंतर त्या वेळच्या नियमानुसार त्याच्यावर १४ दिवस उपचार करून तसेच त्याच्या तीन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर १४ एप्रिलला म्हणजेच तब्बल १६ दिवसांनी घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर प्रारंभीचा १००० कोरोनामुक्ततेचा टप्पा गाठण्यास ६ जून म्हणजेच सुमारे पावणेदोन महिन्यांचा कालावधी लागला होता, तर त्यानंतरचे दुसरे १००० बाधित कोरोनामुक्त होण्यास अवघा २१ दिवसांचा कालावधी लागला होता. त्यानंतरचे हजार म्हणजेच ३ हजार कोरोनामुक्तीसाठी अवघे १० दिवस लागले होते. तेव्हापासून पाच दिवस ते तीन दिवसात पुढील प्रत्येक हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पाच हजारांसाठी ९१ दिवसजिल्ह्यात प्रारंभी बाधितांचा वेग कमी असल्याने तसेच कोरोना रुग्णांना किमान १४ दिवस रुग्णालयातच ठेवले जात असल्याने कोरोनामुक्तीचा वेग बराचसा धीमा होता. त्यामुळे कोरोनामुक्तीचा पाच हजारांचा टप्पा ओलांडण्यासाठी ९१ दिवसांचा कालावधी लागला होता.
दीड महिन्यात ५ हजार कोरोनामुक्त
मागील दीड महिन्यामध्ये बाधित झटपट बरे होऊन घरी परतू लागल्याने १५ जून ते २९ जुलै या ४५ दिवसात अजून ५ हजार नागरिक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच जूनपासून कोरोनामुक्तीच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली आहे.

Web Title: Coronary artery disease doubles in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.