कोरोना संसर्गामुळे लग्नपत्रिका डिजिटल स्वरूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:40 AM2020-12-04T04:40:42+5:302020-12-04T04:40:42+5:30
डिजिटल लग्नपत्रिका तयार करणाऱ्यांना अच्छे दिन आले असले तरी हजारो लग्नपत्रिकांची छपाई थांबल्याने ऑफसेट प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारे कामगार, ...
डिजिटल लग्नपत्रिका तयार करणाऱ्यांना अच्छे दिन आले असले तरी हजारो लग्नपत्रिकांची छपाई थांबल्याने ऑफसेट प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारे कामगार, प्रेस मालक यांना मात्र बुरे दिन आले आहेत. कोरोनाचा संसर्ग लवकर दूर होऊन नेहमीप्रमाणे सर्व व्यवसाय सुरू होण्याची ते वाट बघत आहेत. शहर व परिसरात लग्नपत्रिका वाटणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. डिजिटल पत्रिकांमुळे त्यांचाही रोजगार बंद झाला आहे.
प्रतिक्रिया :
कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन शुभविवाहाचे नियंत्रण नातेवाईक व मित्रांना डिजिटल स्वरूपात पाठविले जात असून, या पद्धतीचा आता सर्वांनी स्वीकार केला आहे. हजारो लग्नपत्रिका छापून त्या वाटणे आता जिकिरीचे झाले आहे. डिजिटल पत्रिकांमुळे हजारो रुपयांचा खर्च वाचला आहे.
- राजेंद्र चौधरी, मालेगाव वरपिता