कोरोनाबाधित ४,२९४; बळी ३१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:12+5:302021-04-11T04:15:12+5:30

नाशिक : काेरोना बळींनी सतत चौथ्या दिवशी तीसहून अधिक वाढ कायम ठेवली असून, शनिवारी ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे ...

Coronary obstruction 4,294; Victim 31 | कोरोनाबाधित ४,२९४; बळी ३१

कोरोनाबाधित ४,२९४; बळी ३१

Next

नाशिक : काेरोना बळींनी सतत चौथ्या दिवशी तीसहून अधिक वाढ कायम ठेवली असून, शनिवारी ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,६५१ वर पोहोचली आहे, तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा चार हजारांचा आकडा ओलांडून एकूण ४,२९४ पर्यंत मजल मारली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वाढणारे बळी रोखणे हेच प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,०८७ तर नाशिक ग्रामीणला २०२८ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ७७ व जिल्हाबाह्य १०२ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १५, ग्रामीणला १५, तर जिल्हाबाह्य १ असा एकूण ३१ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने पंचवीसहून अधिक राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापेक्षाही कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असाच सूर व्यक्त होऊ लागला आहे.

इन्फो

उपचारार्थी रुग्णसंख्या ३७ हजारांवर

जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३७ हजार १०७ वर पोहोचली आहे. त्यात २१ हजार ५५६ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १३ हजार ३०६ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, १ हजार ८३५ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य ४१० रुग्णांचा समावेश आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल तब्बल विक्रमी नऊ हजारांवर

गत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या ५ ते ६ हजारांवर राहत होती. मात्र, त्यात शनिवारी विक्रमी वाढ होऊन प्रलंबित अहवालांची संख्या ९ हजारांवर गेली आहे. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक मनपा क्षेत्रातील ४५८०, नाशिक ग्रामीणचे ४४४९, तर मालेगाव मनपाचे ६१२ अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबितची संख्या इतकी वाढलेली असल्याने पुढचे तीन दिवस बाधितांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Coronary obstruction 4,294; Victim 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.