कोरोनाची साथ कमी झाली; डेंग्यू, चिकुनगुनिया वाढ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:09+5:302021-06-10T04:11:09+5:30

दर पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचे रुग्ण आढळत असतात. नाशिक शहरात अन्य आजारांपेक्षा डेंग्यूचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दरवर्षी ...

Corona's accompaniment diminished; Possible increase in dengue, chikungunya | कोरोनाची साथ कमी झाली; डेंग्यू, चिकुनगुनिया वाढ शक्य

कोरोनाची साथ कमी झाली; डेंग्यू, चिकुनगुनिया वाढ शक्य

Next

दर पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचे रुग्ण आढळत असतात. नाशिक शहरात अन्य आजारांपेक्षा डेंग्यूचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दरवर्षी तो चिंतेचा विषय असतो. गेल्या वर्षीचा अपवाद वगळला, तर दरवर्षी ही संख्या हजाराच्या आसपास असते. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे डेंग्यूचे मर्यादित प्रमाण होते. ते वगळले तर दरवर्षी डेंग्यूमुळे शहरात कहर असतो. यंदा जून महिन्यापर्यंत ४४ रुग्ण आढळले आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी आहे; परंतु सातपूर परिसरात चिकुनगुनियाचे रुग्ण आढळले असून, त्याठिकाणी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

इन्फो...

...ही घ्या काळजी

- पावसाळ्यात पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती स्थाने वाढतात आणि त्यामुळे मग डासांमुळे होणारे आजार वाढत जातात.

- नागरिकांनी कुठल्याही परिस्थतीत घराच्या परिसरात, छतावर, बाल्कनीत पाणी साचू देऊ नये.

- घराच्या परिसरातील नारळाच्या करवंट्या, फुलदाणी, फ्रीजखालील जागा येथेही पाणी साचू देऊ नये.

इन्फो...

डबक्यांमध्ये गप्पी मासे

१) महापालिकेच्या वतीने ३४ ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्रे आहेत. डासांची अळी खाणारे हे गप्पी मासे या काळात उपयुक्त ठरतात.

२) ज्याठिकाणी डासांची उत्पत्ती स्थाने होऊ शकतील अशा हौदात, पाण्याच्या टाकीत गप्पी मासे सेाडली जातात. नागरिकांनादेखील ती उपलब्ध करून दिली जातात.

कोट...

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यासारखे आजार वाढतात. ते टाळण्यासाठी मुळात पाणी साचू न देणे आवश्यक असते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने जनजागृतीबरोबरच वापरात नसलेले टाकाऊ टायर जप्त करणे, डास निर्मूलन फवारणी वाढवणे आदी कामे केली जात आहेत.

-डॉ. राजेंद्र त्र्यंबके, जीवशास्त्रज्ञ, महापालिका

इन्फो....

...अशी आहे आकडेवारी

डेंग्यू

२०१७

नमुने - २,१६८

पॉझिटिव्ह - ९४९

२०१८

नमुने - ३,१५४

पाॅझिटिव्ह - ८४५

२०१९

नमुने - ३,९७६

पाॅझिटिव्ह - १,१२४

२०२०

नमुने - १,१९१

पॉझिटिव्ह - ३३६

२०२१

नमुने - १५२

पॉझिटिव्ह - ४४

--------

मलेरिया

२०१७

नमुने - ७९,०८३

पॉझिटिव्ह - २६

२०१८

नमुने - ८०,४४५

पाॅझिटिव्ह - २

२०१९

नमुने - ७४,३८६

पाॅझिटिव्ह - २

२०२०

नमुने - ४८,५७३

पॉझिटिव्ह - १

२०२१

नमुने - १९,४३०

पॉझिटिव्ह - ०

--------------

चिकुनगुनिया

२०१७

नमुने - १४

पॉझिटिव्ह - १२

२०१८

नमुने - ११३

पाॅझिटिव्ह - ५७

२०१९

नमुने - ३

पाॅझिटिव्ह - २

२०२०

नमुने - ८

पॉझिटिव्ह - ८

२०२१

नमुने - १२

पॉझिटिव्ह - १०

Web Title: Corona's accompaniment diminished; Possible increase in dengue, chikungunya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.